बोदवड (प्रतिनिधी) बोदवड येथे तहसीलदार नियुक्तीसाठी सरणावर झोपून प्रमोद धामोडे यांनी तहसील समोर आमरण उपोषण सुरू केले होते. याची दखल घेत लवकरच तहसीलदार नियुक्ती करण्यात येईल, असे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्यामुळे धामोडे यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.
तहसीलदार नियुक्तीसाठी सरणावर झोपून प्रमोद धामोडे यांनी तहसील समोर दि. 19 पासून आमरण उपोषण सुरू केले होते. हे उपोषण तिसऱ्या दिवशी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भ्रमणध्वनीवरून दिलेल्या आश्वासनानंतर सुटले आहे. पुढील दोन-तीन दिवसात बोदवड तालुक्याला नवीन तहसीलदार नियुक्तीचे आदेश देण्यात येणार, असे तोंडी आश्वासनानंतर आमदार एकनाथराव खडसे यांच्या हातून थंड पेय घेऊन उपोषण सोडण्यात आले. यावेळी प्रभारी तहसीलदार श्वेता संचेती, गटविकास अधिकारी हेमंत काथेपुरी, निवासी नायब तहसीलदार संध्या सुर्यवंशी यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थितीत होते.