धरणगाव (प्रतिनिधी) नगरपरिषद मार्फत शहरातील लाभार्थ्यांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज विनामूल्य भरण्याची सुविधा करण्यात आली असून यासाठी नगरपरिषद कार्यालयात मदत कक्ष व सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
शहरात प्रत्येक प्रभागात योजनेचे अर्ज भरणेबाबत जनजागृती करण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे त्यामुळे लाडक्या बहिणींची चांगलीच मदत झाली आहे. धरणगाव नगरपरिषद कार्यालयात दररोज सकाळी ८ ते दुपारी २आणि दुपारी २ ते रात्री ८ पर्यंत अश्या दोन शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
वरील वेळेत सदर केंद्रावर लाभार्थीचे अर्ज स्वीकारणे, तपासणे, पोर्टलवर अपलोड करणे आदी सर्व कामे विनामूल्य केली जाणार आहेत. तरी महिला भगिनींनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी केले आहे.