जळगाव (प्रतिनिधी) भाजप कार्यालयात कोविड हेल्प वार रूमची स्थापना करण्यात आली. शहरातून, जिल्ह्यातून किंवा कुठूनही कॉल आला तर सर्वाना मदत करायची आहे, अशा सूचना जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) तथा आ. सुरेश दामू भोळे (राजुमामा) यांनी दिल्या आहेत.
आज दि. २९ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टी वसंतस्मृती बळीराम पेठ जळगाव येथे महानगर व जिल्हातर्फे कोविड हेल्प वॉर रूमची स्थापना करण्यात आली व त्यांना तिथे हेल्पलाईन नंबर देण्यात आले. 8446465527, 8446465528 असे दोन नंबर त्यांना देण्यात आले. त्याप्रसंगी जिल्हाध्यक्ष तथा आ. सुरेश दामू भोळे (राजुमामा), महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे, धिरज वर्मा, जिल्हा सहप्रसिद्धि प्रमुख, युवा मोर्चा महानगराध्यक्ष आनंद सपकाळे, जिल्हा महानगर उपाध्यक्ष बापू ठाकरे, महानगर चिटणीस राजू मराठे, भगतसिंग निकम, नगरसेवक महेश चौधरी, मंडल क्र.१ अध्यक्ष रमेश जोगी, मंडल क्र.२ अध्यक्ष परेश जगताप, ओबीसी मोर्चाचे जयेश भावसार, जिल्हा कार्यालय मंत्री गणेश माळी, महानगर कार्यालय मंत्री प्रकाश पंडित आदी उपस्थित होते.
















