जळगाव (प्रतिनिधी) येत्या विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन भरण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारांना सभा घेताना किंवा काही कार्यक्रम घेताना अनेक परवानग्या असणे आवश्यक आहे. यासाठी विधानसभा मतदारसंघ निहाय विविध परवानग्या देण्यासाठी सुविधा कक्षांची स्थापना करण्यात आलेली आहे.
ज्यामध्ये उमेदवारांना जाहिर सभा, चौक सभा व सर्व प्रकारच्या सभा घ्यावयाची असेल तर संबंधित पोलीस निरिक्षक/पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी त्यांना परवानगी देतील. यासाठी उमेदवाराला अर्ज, सभेसाठी जागेची परवानगी देतांना जागा स्थानिक प्राधिकरणाच्या ताब्यात असल्यास त्यांचेकडील ना हरकत दाखला, भाडे पावती , शिक्षण संस्था किंवा अन्य खाजगी संस्था यांच्या मालकीची जागा / मैदान असल्यास संबंधीत संस्थेचे संमत्ती पत्र उप विभागीय अधिकारी यांचा ना – हरकत दाखला लागेल. स्वतंत्र प्रवेश व बाहेर जाण्याचा मार्ग असे आवश्यक, सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस विभागाने छाननी करुन अशा प्रस्तावास मान्यता देतील आणि संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांनी सदर सभेसाठी Annexure D-I मधील प्रपत्र संबधीतांकडून घेतील. तसेच सक्षम प्राधिकारी यांना आवश्यक वाटतील अशी अन्य कागदपत्रे आवश्यक आहे.
सभेच्या ठिकाणी पोस्टर्स, झेंडे, कापडी बॅनर्स लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका/नगर परिषद/ नगरपालिका/ ग्रामपंचायत/ नगर पंचायत यांची परवानगी असणे आवश्यक आहे. यासाठी अर्ज, खाजगी जागा असल्यास मालक संमतीपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थाची जागा फी, परवाना फी./ जाहिरात फी लागणार आहे.
खाजगी जागेवर जाहिरात फलक / प्रचार साहित्य लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका/ नगरपरिषद/नगरपालिका / ग्रामपंचाय अधिकारी यांची परवानगी आणि अर्ज, खाजगी जागा असल्यास जागा मालकाचे संमतीपत्र, स्थनिक स्वराज्य संस्था जागा परवाना फी, पोलिस नाहरकत दाखला लागणार आहे.
विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात उमेदवारांकरिता प्रचार वाहन परवानगी आणि मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष यांना संपूर्ण जिल्हयात प्रचार वाहन परवानगी निर्गमित करणे करिता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या परवानगीची आवश्यकता असते. यासाठी अर्ज, आर.सी.बुक , वाहनाचा इन्शुरन्स, टॅक्स भरण्याची पावती, पीयुसी, वाहनांचे फिटनेस सर्टीफिकेट, बाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा ना हरकत दाखला, वाहनाच्या चारही बाजुचा फोटो, पोलिस नाहरकत दाखला, व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, चालकाचा परवाना असणे आवश्यक आहे.
उमेदवाराच्या तात्पुरत्या प्रचार कार्यालयासाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांची परवानगी असणे आवश्यक आहे. ज्यात अर्ज .खाजगी जागा असल्यास जागा मालकाचे संमतीपत्र, स्थनिक स्वराज्य संस्था जागा परवाना फी, पोलिस ना हरकत दाखला लागणार आहे.
हेलिपॅड व हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे वतीने अपर जिल्हादंडाधिकारी परवानगी देणार आहे.यासाठी अर्ज (अ) हेलीकॉप्टर उतरविणे पुर्वी किमान 24 तास अगोदर अर्ज सादर करणे (ब) प्रवास करणाऱ्या व्यक्तींचा तपशिल (क) प्रवासाबाबत तपशिल (ड) हेलीकॉप्टर उतरविण्याचे ठिकाण नमूद केलेले असावे. यासोबतच पोलीस अधिक्षक यांचे ना हरकत प्रमाणपत्र, मनपा/नपा/ग्रामपंचायत यांचे ना हरकत प्रमाणपत्र, सार्वजनिक बांधकाम विभाग ना हरकत प्रमाणपत्र, अग्निशमक दल यांचे ना हरकत प्रमाणपत्र, रुग्ण्वाहिका उपलब्धतेबाबत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
ध्वनिक्षेपकाच्या परवानगीसाठी संबंधित पोलीस स्टेशन निरीक्षक किंवा प्रभारी पोलीस स्टेशन अधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे. या परवानगी साठी अर्ज, वाहनांसाठी आरटीओ व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे परवानगी नंतर पोलीस स्टेशन प्रभारी यांनी परवानगी घ्यावी लागणार आहे. शाळेचे मैदानावर सभा घेण्यासाठी ना-हरकत दाखला मिळवण्याकरिता उपविभागीय दंडाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. यासाठी अर्ज, शाळा व्यवस्थापन ना हरकत प्रमाणपत्र, पोलीस विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.
सोशल मिडीया, इलेक्ट्रानिक मिडीया, Bulk SMS , प्रिंट मिडीयावर जाहिराती, प्रसिध्द करावयाच्या असतील MCMC कमीटीच्या संमंतीने जिल्हा माहिती अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. फ्लेक्स, बोर्ड, झेंडे, होर्डींग्ज, बॅनर, पोस्टर्स इ. प्रचार साहित्य स्वत:च्या खाजगी इमारतीवर लावण्यासाठी संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी असणे आवश्यक आहे. यासाठी इमारतीवर झेंडे, पोस्टर्स, बॅनर्स, लावणेसाठी परवानगी देतांना संबंधित जागा मालकाची संमती , ठरलेल्या भाडयाच्या रकमेचा तपशिलाची कागदपत्रे, तसेच सक्षम प्राधिकारी यांना आवश्यक वाटतील अशी अन्य कागदपत्रे, वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा पध्दतीने पोस्टर्स प्रदर्शन करणेची दक्षता संबंधीतांनी घेणेची अट याची पुर्तता करणे आवश्यक आहे.
यासोबतच मिरवणूक, पदयात्रा, रॅली, प्रचार फेरी, रोड शो करण्यासाठी संबंधित पोलीस निरिक्षक/पोलिस स्टेशन प्रभारी यांच्या परवनगीसोबत अर्जदाराचा अर्ज, पदयात्रा – रॅलीचा मार्गाचा आराखडा, वाहनासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे ना हरकत प्रमाणपत्र, पदयात्रा – रॅलीच्या मार्गाच्या आराखडयास वाहतूक पोलीसांची परवानगी, तसेच सक्षम प्राधिकारी यांना आवश्यक वाटतील अशी अन्य कागदपत्रे आवश्यक आहे.