जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मुळजी जेठा महाविद्यालयाच्या जवळ पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार यांना विनामास्क अवस्थेत मुली फिरतांना आढळून आली. तिला तात्काळ महिला कर्मचारी स्वाती बगे यांच्या मदतीने पोलीस स्टेशनला आणले असून तिच्या परिवाराचा तपास करुन त्यांचा ताब्यात देण्यात आले आहे. ही घटना आज (दि११) रोजी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एम जे कॉलेज पॉइंट ड्युटीला असलेले पोलीस कॉ /177 महेश पवार यांनी फोनद्वारे माहिती दिली की, एक मुलीचे वय अंदाजे १६ ते १७वर्षे असून ही विनामास्क अवस्थेत फिरत आहे. तिला तिचे नाव विचारता उत्तर सांगता येत नसल्याने तात्काळ त्या ठिकाणी महिला कर्मचारी स्वाती बगे यांना रवाना केले व अनोळखी मुलीस पोलीस स्टेशनला आणून विश्वासात घेऊन विचारपूस करता पोलीस निरीक्षक यांनी तिला तिचे नाव गाव पत्ता सांगितले. परंतु तो चुकीचा निघाला. तरीही तिच्या फोटोने वेगवेगळ्या पो स्टेच्या ग्रुपवर व कर्मचाऱ्यांना माहिती देऊन तिचा खरा पत्ता व कुटुंबीय यांचा शोध घेऊन तिला तिची आई सकिना बी शेख रहीम (वय 52 वर्षे रा.उमर मशिदीजवळ अक्सा नगर मेहरून, जळगाव) यांना आधार कार्ड द्वारे व्हेरिफाय करून परिसरातील प्रतिष्ठित नागरिक 1) हाजी शेख युसुफ तसेच 2)एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष जीया बागवान यांचे समक्ष पोलीस निरीक्षक यांनी पडताळणी करून पोलीस नाईक/1303विनोद सोनवणे ना /271चंद्रकांत पाटील कुटुंबीयांची भेट घालून ताब्यात दिले.