साकळी (प्रतिनिधी ) भारताची पहिली किसान रेल्वे दिनांक ७ ऑगस्ट २०२० रोजी देवळाली ते दानापूरकडे चालवण्यात आली आणि आता देवळाली व मुजफ्फरपूर दरम्यान आठवड्यातून ३ दिवस धावत आहे. किसान रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि १९ ट्रिप मधून दिनांक २ सप्टेंबर २०२० पर्यंत ५,२२३ टन मालाची वाहतूक झाली आहे.
डाळिंब, ढोबळी मिरची (कॅप्सिकम), हिरव्या मिरच्या, आले, लिंबू, आइस्ड फिश यासारख्या वस्तू शेतकर्यांच्या रेल्वेमध्ये वाहतूक केली जात आहे. डाळिंब २०३९ टन, मिक्स भाज्या १३०३ टन व इतर वस्तूंची वाहतूक केली गेली आहे. सोलापूर विभागातील सांगोला, मोडलिंब, बेलावंडी, बेलापूर आणि कोपरगाव स्थानकांवर पीओएस मशीन बसविल्यामुळे, किसान रेल्वेमध्ये कृषी माल बुक करण्यासाठी एक नवीन सुविधा देखील सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे व्यवसायाची सुलभता आणि त्वरित व्यवहार आणि वेळेची बचत होईल. याचा शेतकऱ्यांना यांचा विपुल प्रमाणात फायदा होत आहे.