अहमदाबाद (वृत्तसंस्था) सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका सेक्स व्हिडीओमुळे गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओचा एक फोटो दाखवून आम आदमी पार्टीच्या नेत्याने १५ ऑगस्टला संपूर्ण व्हिडीओ समोर आणणार असल्याचा दावा केला आहे. मात्र तत्पूर्वीच हा व्हिडीओ शेअर होऊ लागला आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये दिसत असलेली व्यक्ती भाजपाचे खासदार परबत पटेल असल्याचा दावा केला जात आहे.
बनासकांठाच्या आम आदमी पक्षाचे (आप) नेते माधाभाई पटेल यांनी या व्हिडिओसंदर्भात आपल्या फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यांनी पोस्टसह एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये कोणाचाही चेहरा दिसत नव्हता, पण माधाभाईंनी लिहिले होते की ते या भाजप नेत्याचा संपूर्ण व्हिडिओ १५ ऑगस्ट रोजी त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट करतील.
ही पोस्ट व्हायरल होताच भाजप नेते आणि खासदार परबत पटेल यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली. व्हायरल व्हिडिओबद्दल आपल्याला जास्त माहिती नसल्याचे पटेल यांनी सांगितले होते. त्यांनी असा दावा केला होता की आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेलिंग आणि बदनामी करण्याच्या हेतूने कोणत्यातरी व्हिडिओशी छेडछाड करून तयार केला.. पटेल यांनी मुलीची ओळख करण्यासही नकार दिला होता. यापूर्वीही मला ब्लॅकमेल आणि बदनाम करण्याचे प्रयत्न झाले असल्याचे त्यांनी सांगितले होते. “मी कधीही कोणतेही वाईट काम केले नाही. माझा फोटो एडिट करून तेथे लावला गेला असल्याची शक्यता असल्याचे पटेल यांनी सांगितले होते.
मात्र, आप नेते मघाभाई यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये खासदार परबत पटेल पालनपूरच्या शासकीय अतिथीगृहात अश्लिल चाळे करताना पकडले गेले असल्याचे म्हटले आहे. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी परबत पटेल यांच्या मुलाने माधभाई पटेल आणि मुकेश राजपूत या दोघांविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. पटेल यांचे पुत्र शैलेश म्हणाले की, माझे वडील निर्दोष असून त्यांची बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने परबत भाई पटेल यांचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. पटेल यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये खासदार एका तरुणीसोबत आक्षेपार्ह स्थितीत बसलेले दिसत आहेत. बनासकांठाचे पोलीस उपअधीक्षक पी एस चौधरी म्हणाले की, बनसकांठाचे भाजपा खासदार परबत भाई पटेल यांचा अश्लील व्हिडिओ इंटरनेट मीडियामध्ये व्हायरल करण्याबाबत खासदारांकडून तक्रार प्राप्त झाली होती. यावर कारवाई करत पोलिसांनी अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या एकाला अटक केली आहे.