भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील जामनेर रोडवर श्रध्दा कॉलनीत असणाऱ्या गजानन महाराज मंदिराच्या समोर मध्यरात्रीनंतर एका तरूणाचा चेहरा दगडांनी ठेचून खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेमुळे भुसावळात पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील जामनेर रोडवर श्रध्दा कॉलनीत असणाऱ्या गजानन महाराज मंदिराच्या समोर मध्यरात्रीनंतर एका तरूणावर चाकून सपासप वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना घडली. या तरुणाचा चेहरा दगडांनी ठेचून टाकण्यात आला आहे. मृत तरूणाचा चेहर दगडांनी ठेचून टाकल्यामुळे त्याची ओळख पटविण्यात अडचणी येत आहेत.
दरम्यान, पहाटे या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठचे पोलीस निरिक्षक दिलीप भागवत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याचा पंचनामा करण्यात आला असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.