भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वाडे येथील माध्यमिक विद्यालयात प्रेमी युगलाने गळफास घेतल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, मुकेश कैलास सोनवणे (वय २२, रा. वाडे, ता. भडगाव) आणि तरूणी ही नेहा बापू ठाकरे (वय १९, रा. वाडे) असे या प्रेमी युगलांची नावे आहे. प्राथमिक माहितीनुसार हे प्रेमी युगल असून आपल्या विवाहाला समाज मान्यता मिळणार नाही याच्या भितीपोटी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. माध्यमिक विद्यालयातील मजल्यावर जिन्यावर जाऊन गळफास घेत त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा भयंकर प्रकार उघड झाला. याची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांसह भडगाव पोलीस स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हे दोन्ही एकाच समाजाचे असल्याचे वृत्त आहे. या दोन्ही जणांचे मृतदेह खाली उतरवून त्यांच्या पार्थिवाला शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलीस पाटील अरविंद फकीरा पाटील यांच्या खबरीवरून मयत मुकेश कैलास सोनवणे, नेहा बापू ठाकरे यांच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय सुशील सोनवणे हे करीत आहेत.