जळगाव (प्रतिनिधी) आमदार मंगेश चव्हाण यांनी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India)कडे जळगाव दुध संघाशी संबंधी तक्रार केली होती. त्यानुसार १७ ऑक्टोंबर रोजी पथकाने दुध संघात तब्बल १० ते ११ तास चौकशी केली होती. या पथकाने तूप आणि बटरचे सॅम्पल नेत तब्बल १ कोटीहून अधिकचा माल सील केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांनी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India)कडे जळगाव दुध संघाशी संबंधी तक्रार केली होती. त्यानुसार १७ ऑक्टोंबर रोजी केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी रुपाली डोळस आणि तांत्रिक अधिकारी दादासाहेब विश्वासे या दोन सदस्यीय पथकाने दुध संघात तब्बल १० ते ११ तास चौकशी केली होती. या पथकाने तूप आणि बटरचे सॅम्पल नेले होते. त्यांच्या अहवालाचीही प्रतीक्षा लागून असून ते नेमकं काय कारवाई करतात? याकडे देखील अनेकांचे लक्ष लागून आहे. धक्कादायक म्हणजे केंद्रीय पथकाने तूप आणि बटरचे सॅम्पल नेत तब्बल १ कोटीहून अधिकचा माल सील केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप स्थानिक पोलीस किंवा जळगाव एफडीआयने दुजोरा दिला नाहीय.
एवढेच नव्हे तर, हा माल इंदोरच्या एका पार्टीसाठी होता. अगदी दुध संघातील एकाने (जो सध्या अटकेत) आहे, त्याने हा माल पुरविण्याच्या नावाखाली ५ लाखांचा अॅडव्हांस देखील घेतला असल्याचे कळते. दरम्यान, दुध संघात कोट्यावधींचा माल केंद्रीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या पथकाने सील केला असल्याची माहिती विचारली असता जळगाव पोलिसांनी माहित नसल्याचे उत्तर दिले. तर जळगावच्या एफडीआयच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीच्या पथकाशी संपर्क साधून आहोत, उद्या माहिती मिळणार असल्याचे सांगीतले. वास्तविक बघता नमुन्यांचा अहवाल १५ दिवसात मिळतो. परंतू कारवाईला एक महिना झाल्यानंतरही काहीही माहिती समोर येत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, जळगाव दुध संघ हा केंद्रीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या अधीन आहे. त्यामुळे राज्याच्या एफडीआयच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. परंतू दुध संघातील अखाद्य तुपाच्या माध्यमातून चॉकलेट बनविण्याचा गोरख धंदा उघडकीस आल्यामुळे आता जळगाव ‘एफडीआय’देखील कारवाई करणार आहे.