TheClearNews.Com
Thursday, December 25, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

… प्रेतांच्या खचाचे राजकीय भांडवल म्हणून वापरण्याचा विचार फडणवीस करु शकतात : अनिल गोटे

The Clear News Desk by The Clear News Desk
April 12, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) महाराष्ट्रात कोरोना महामारीने अक्षरशः हैदोस घातला आहे. नगरसारख्या शहरात एकाच दिवशी ४९ मृतांना अग्नी द्यावा लागला. स्मशान भूमीत पुरेशी जागा नसल्याने एकाच यावर आठ-दहा प्रेतांचे एकत्रित सरण रचावे लागते. पण याही परिस्थितीत स्मशान भुमीत पडलेल्या प्रेतांच्या खचाचे राजकीय भांडवल म्हणून वापरण्याचा विचार केवळ देवेंद्र फडणवीस आणि त्यासमान बौध्दीक पातळीचे नेतेच करु शकतात, अशी झणझणीत टिका भाजपचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.

आपल्या पत्रकात ते पुढे म्हणतात की, फडणवीसांना सत्ताच्युत करुन स्थापन झालेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या स्थापना दिवसापासून त्यांनी केवळ टिका करणे, सरकारची चूक असो, नसो रोज उठून मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणे, मंत्रीमंडळ पाडण्यासाठी राजकीय विधिनिषेध बाजूला ठेऊन अत्यंत नीच दर्जाचे कटकारस्थान करणे. एवढे एकच काम फडणवीस आणि त्यांची टोळी फार हिरीरीने करीत आहे. करोनाच्या अस्मानी संकटाविरुध्द लढण्यासाठी एकमताने निर्णय व्हावा. यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्ष नेत्यांची मते जाणून घेतली. उपाय सुचवावे अशी विनंती केली. उपाय सुचविण्याचे दुरच ! पण मिडीयासमोर मात्र थोबाड वासून, चमकोगिरी करण्यात कुणीही कसर सोडलेली नाही. केलेल्या सूचना बघा. शंभर टक्के लॉकडाऊन नको, मग नेमके काय करायला हवे ? हे कुणीही सुचवलं नाही. लहान व्यापाऱ्यांना संरक्षण द्या ! कर्ज काढा ! पण व्यापाऱ्यांना रोख मदत करा. इटलीने केले, फ्रान्सने केले, ब्रिटनने केले, जर्मनीने केले. हे सांगायचे पण त्या देशातील पंतप्रधानांनी, राष्ट्रध्यक्षांनी देशपातळीवर घोषणा करुन मदत केली आहे. हे मात्र सोयीस्करपणे लपवून ठेवायचे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी व राष्ट्रपतींनी काय मदत केली ? हे जनतेला कळू द्या ना ! संकट काही एकट्या महाराष्ट्रावर आले नाही. पुर्ण देशावर आलेले आहे. शेजारच्या गुजरात राज्यातील सुरत येथे एका दिवसात ७२ करोनाग्रस्तांना एकाच वेळी अग्नी द्यावा लागला. कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांनी परडोई किती रक्कम करोना ग्रस्तांच्या खात्यात वर्ग केली ? याचे आकडेही भाजपाच्या पोपटांनी प्रसिध्द केले असते. तर बरे झाले असते. येऊन जाऊन जनतेचा उद्रेक होईल. अशा धमक्या देवून वातावरण गढूळ करणे, जनतेला धीर न देता घाबरवून सोडणे, सरकार करीत असलेले प्रयत्न हाणून पाडणे हाच एकमेव कार्यक्रम सुरु आहे. आम्ही महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखू, जबाबदार विरोधी पक्षनेता म्हणून अशी भूमिका घेण्याएवजी उद्रेक होईल, लोक रस्त्यावर येतील असल्या धमक्या देण्यातच भाजपचे नेते धन्यता मानीत आहेत. महाराष्ट्रातील जनता इतकीही दुधखुळी नाही. को, फडणवीस आणि त्यांच्या टोळीचा कावेबाजपणा जनतेच्या लक्षात येत नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाच्या जवळची, परिचयातली, नात्यातली कुठली ना कुठली व्यक्ती कोरोना महामारीने बळी पडली आहे.

READ ALSO

मनपा निवडणुकीसाठी आजपासून नामनिर्देशन भरण्यास सुरुवात

चाळीसगावात प्रतिभा चव्हाण यांचा दणदणीत विजय

आपल्या पत्रकात अनिल गोटे यांनी पुढे म्हटले आहे की, प्रत्येक घटनेचे राजकारण करण्याची घाणरेड्या सवयीने देवेंद्रजींचे व्यक्तीगत वाटोळे तर होईलच. ‘हम तो डूबेंगे सनम, लेकीन तुम्हे भी साथ लेकर डुबरेंगे अशी विरोधी पक्षाची अवस्था आपल्या हेकेखोर व अहंकारी स्वभावामुळे त्यांनी स्वत:च निर्माण केली आहे. महाराष्ट्राला लसी उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्राकडून रोज किमान पाच लक्ष लसी मिळवून देण्याचे, प्रयत्न करण्याबद्दल आवाक्षर काढायचे नाही. हे राज्यातील भाजपाचे धोरण तर, केंद्र शासन देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी लसी उपलब्ध करुन देण्याएवजी बांगलादेश, नेपाळ इत्यादी देशांना लस पुरवठा करीत आहे. पंतप्रधान आसाम, पश्चिम बंगाल, तामीळनाडू येथील निवडणुकांमधे प्रचारासाठी लक्षावधीच्या संख्येने सभा घेण्यात धन्यता मानीत आहेत दिल्लीतील शेतकरी आंदोलनासाठी त्यांना वेळ नाही. करोना महामारीवर उपाय शोधण्यासाठी वेळ नाही. त्यांना करोना उत्सव साजरा करावासा वाटतो. मेणबत्त्या लावा. कधी टाळ्या पीटा, कधी थाळ्या वाजवा, असले बालीश उद्योग करण्यातच धन्यता मानीत आहेत. महाराष्ट्राला कमी पडत असलेल्या लसी मिळविण्याकरीता, जी.एस.टी. चे राहीलेले ३० हजार कोटी मिळवून देण्याकरिता आम्ही केंद्राकडे जाऊ, असे म्हणणे राहीले तर दुरच ! केंद्रातील सरकारने आपल्या संकुचीतपणाने कळस गाठला आहे. पुणे महापालीकेत भाजपाची सत्ता आहे. म्हणून त्यांना परस्पर लसींचा पुरवठा करणे. राज्यातील रुग्णांची संख्या लक्षात न घेता, आठवडे बाजारात वाटा पध्दतीने भाजी विकणाऱ्या भाजी वालीसारखे वाटे पाडून लसींचे वाटप करणे. हे काही निकोप राज्यकत्त्याचे लक्षण नव्हे ! जनतेतून आज प्रतिक्रीया येणार नाही. उद्रेक वगैरे होणार नाही. पण निवडणुकीच्या कठीण काळात फक्त मतदारांच्या जखमेवरील खपली काढण्याचे निमित्त राहिल. मग कळेल की, जनतेचा जोर का झटका धीरे से कसा लागतो ! असेही पत्रकात अखेरीस म्हटले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मनपा निवडणुकीसाठी आजपासून नामनिर्देशन भरण्यास सुरुवात

December 23, 2025
चाळीसगाव

चाळीसगावात प्रतिभा चव्हाण यांचा दणदणीत विजय

December 22, 2025
जळगाव

रावेर लोकसभेत भाजपाचा दबदबा; जळगावात शिंदे गट ‘फॉर्मात’

December 22, 2025
जळगाव

आमदार मंगेश चव्हाण यांची जळगाव महानगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती

December 18, 2025
जळगाव

शिवसेना शिंदे गटाने फुंकले जळगाव महापालिकेचे रणशिंग !

December 15, 2025
धरणगाव

शिवसेना उ बा ठा उपजिल्हा प्रमुख पदी महेंद्र महाजन याची निवड

December 15, 2025
Next Post

खान्देशात ७० हजार शेतकऱ्यांनी केला ७७ कोटींचा भरणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तुमच्या अकाउंटमध्ये गॅस सबसिडी येत नाही का? ; मग घर बसल्या करा ‘हे’ काम, सुरु होईल सबसिडी !

December 22, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2025 !

September 26, 2025

शिक्षकांनी अध्यापनातून विद्यार्थ्यात संविधानाची मूल्य रुजवावीत शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण

November 27, 2025

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले ८७.८७ टक्क्यांवर !

October 4, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group