TheClearNews.Com
Saturday, August 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खान्देशात ७० हजार शेतकऱ्यांनी केला ७७ कोटींचा भरणा

कृषी वीजयंत्रणेसाठी मिळणार हक्काचा ५३ कोटींचा निधी

The Clear News Desk by The Clear News Desk
April 12, 2021
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महा कृषी ऊर्जा अभियानात कृषिपंपांच्या थकबाकीत तब्बल ६६ टक्के सवलत मिळवत खान्देशातील जवळपास ७० हजार शेतकऱ्यांनी ७७ कोटींचा भरणा केला आहे. या अभियानातील सहभागासोबतच आपल्या ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रातील कृषी वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी तब्बल ५३ कोटींचा हक्काचा ६६ टक्के निधीही या शेतकऱ्यांना मिळणार आहे.

महा कृषी ऊर्जा अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे वीजबिलांतून थकबाकीमुक्त होण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांसह खान्देशातील शेतकऱ्यांनीही पुढाकार घेतला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारातून वीजबिलांच्या वसुलीमधील तब्बल ६६ टक्के रकमेचा निधी हा संबंधित ग्रामपंचायत व जिल्ह्यातील कृषी वीजयंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या तरतुदीमुळे शेतकरी‍ बिल भरण्यास प्रतिसाद देत आहेत. मागील वर्षी १ एप्रिल २०२० पासून जमा होणाऱ्या वसुलीच्या रकमेची कृषी आकस्मिक निधी म्हणून स्वतंत्र नोंद ठेवली जात आहे. खान्देशाच्या कृषी आकस्मिक निधीमध्ये चालू व थकीत वीजबिलांच्या भरण्यातून आतापर्यंत एकूण ८० कोटी ५४ लाख रुपये जमा झाले आहेत. त्यापैकी ६६ टक्के रक्कम म्हणजे तब्बल ५३ कोटी १६ लाख रुपयांचा निधी संबंधित ग्रामपंचायत व जिल्ह्यातील कृषी वीजयंत्रणेच्या विविध कामांसाठी वापरण्यात येणार आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन केले असून शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्तीसह ग्रामपंचायत व जिल्ह्यातील वीजविषयक विकासासाठी गावकऱ्यांनी यापुढेही सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.

READ ALSO

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

या अभियानात कृषिपंपांच्या वीजबिलापोटी जळगाव जिल्ह्यातील ३५ हजार ३८६ शेतकऱ्यांनी ४४ कोटी ३४ लाख, धुळे जिल्ह्यातील २० हजार १९० शेतकऱ्यांनी १३ कोटी १३ लाख तर नंदुरबार जिल्ह्यातील १४ हजार ११९ शेतकऱ्यांनी १९ कोटी ३१ लाख असे खान्देशात ६९ हजार ६९५ शेतकऱ्यांनी ७६ कोटी ७८ लाख रुपये भरले आहेत. कृषी आकस्मिक निधीमध्ये जळगाव जिल्ह्यास ३० कोटी ६४ लाख, धुळे जिल्ह्यास ९ कोटी तर नंदुरबार जिल्ह्यास १३ कोटी ५२ लाख रुपये उपलब्ध झाले आहेत. नवीन उपकेंद्र, वितरण रोहित्र, वीजजोडण्या, कृषी वाहिन्या आदींच्या कामांसाठी या निधीचा वापर होणार आहे. संबंंधित ग्रामपंचायत व जिल्ह्यातील वीजविषयक विविध कामांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे तर अनेक ठिकाणी कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

August 21, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
Next Post

राज्यातील कडक लॉकडाउनची तारीख ठरली? 'या' दिवसापासून होऊ शकतो १४ दिवसांचा लॉकडाऊन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वरणगावात रस्ता ओलांडणाऱ्या महिलेस ट्रॅक्टरने चिरडले !

September 30, 2022

जिल्ह्यात आज आढळले ३१८ कोरोनाबाधित, १३५ झाले बरे !

February 26, 2021

वहीगायन कलावंतांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कटिबंध, कलेला राजाश्रय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार : आमदार मंगेश चव्हाण !

November 13, 2022

धरणगावातील तिळवण तेली समाज बांधवांनी घेतली पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट !

August 4, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group