चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील फार्मसी महाविद्यालय चोपडा येथे नुकतेच एक दिवसीय चर्चासत्राचे Journey from Campus to Continent या विषयावर यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.
सदरहु कार्यक्रमाला नेदरलँड येथील मेचेंत्रा इंजीनियरिंग सर्विसेस अँड कन्सल्टंट (Mechentra Engineering Services and Consultant Netherland) या कंपनीचे संस्थापक व संचालक श्री कौशल पाटील व नेदरलँड येथील सिम्बॉलाईज कम्युनिकेशन या कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या सौ. योगिता पाटील निंबाळकर हे मान्यवर व्याख्याते म्हणून उपस्थित होते. यांनी प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले की , प्रामाणिकता, कठोर परिश्रम व मेहनत करूनच यशाचे शिखर गाठता येते. आमंत्रित व्याख्यात्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले व त्यांचा आत्मविश्वास वाढविला. तसेच स्वतःचे अनुभव कथन करत असतांना आयुष्यात सर्वांना अपयश व अडथळे येतात या सर्व अडथळ्यांचे व अपयशाचे संधीत रूपांतर करता यायला पाहिजेअसे मनोगत श्री कौशल पाटील यांनी व्यक्त केले.चोपड्यासारख्या ग्रामीण भागातून जाऊन आज स्वतःचे अस्तित्व दुसऱ्या भागात निर्माण करून तिथल्या लोकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. नलिनी मोरे व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. तनवीर शेख यांनी केले.
महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अँड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. स्मिता संदिप पाटील, उपाध्यक्षा श्रीमती आशाताई पाटील व प्राचार्य डॉ. गौतम पी वडनेरे यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख प्रा. डॉ. भरत जैन, प्रा. डॉ. संदीप पवार, प्रा. डॉ. मो. रागीब मो. उस्मान, प्रा. कुंदन पाटील, प्रा. नलिनी मोरे, शैक्षणिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. तन्वीर शेख, आयक्यूएसी समिती प्रमुख प्रा. डॉ. सौ.सुवर्णलता महाजन व प्रबंधक श्री प्रफुल्ल मोरे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने कार्यक्रम यशस्वी होण्याकरता सहकार्य केले.