चोपडा (प्रतिनिधी) कोरोना काळात ज्यांनी खरे कोरोना योद्धा म्हणून आपले कर्तव्य बजावले, जनतेच्या आरोग्य आणि सुरक्षेसाठी उन्हाळ्याच्या कडक उन्हातही आपली सेवा अविरत बजावली अश्या पोलीस बांधवांसाठी चोपडा येथील शिवाजी महाराज चौकातील पोलीस चौकीसाठी रोटरी क्लबतर्फे सामाजिक जबाबदारी म्हणून फॅन आणि ट्यूबलाईट भेट देण्यात आले.
आज चोपडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ठेंगे साहेब यांच्या उपस्थितीत बूथवरील पोलीस कर्मचाऱ्यांना रोटरीच्या मेंबर्स यांच्या उपस्थितीत सदर साहित्य देऊन आपली कृतज्ञता व्यक्त केली. सदर कार्यक्रमासाठी रोटरी अध्यक्ष नितीन अहिरराव, सचिव रुपेश पाटील, पंकज बोरोले, अनिल अग्रवाल, विलास कोष्टी, चंद्रशेखर कोष्टी, प्रकाश पाटील, शिरीष पालीवाल, डॉ. अमोल पाटील, अरुण सपकाळे, प्रदीप पाटील, निखिल सोनावणे, अर्पित अग्रवाल, चेतन टाटीया, गौरव महाले, पृथ्वीराज राजपूत, शशिकांत पाटील, धीरज अग्रवाल व मनोज पाटील रोटरीचे वरिष्ठ सदस्य एम डब्लू पाटील ई.रोटरी सदस्य उपस्थित होते.