साकळी ता.यावल ( प्रतिनिधी ) यावल तालुक्यातील भालोद येथील माती फाऊंडेशनतर्फे सातपड्याच्या पायथ्याशी असलेल्या आसराबारी येथील आदिवासी बांधवांना दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप करण्यात आले.
बालकांना बिस्किटचे वाटप करण्यात आले. बालकांच्या व त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यांवर आनंद फुलला होता. गरीबांची दिवाळी काही प्रमाणात का होईना आनंदात जावी या उद्देश्याने संस्थचे अध्यक्ष दिपक जावळे, उपाध्यक्ष तुषार परतणे व सदस्य चेतन चौधरी, खेताराम चौधरी, चेतन पाटील, चंदन चौधरी, ओमेश झांबरे, अशोक चौधरी यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमचे कौतुक होत आहे.