कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) फरकांडे तालुका एरंडोल येथील फरकांडे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नवीन इमारत बांधकामाचा शुभारंभ एरंडोल पालिकेचे माजी नगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत २९ एप्रिल रोजी करण्यात आला.
यावेळी विकास सोसायटीचे चेअरमन समाधान दयाराम पाटील, संस्थेचे संचालक नामदेव पाटील, रामराव पाटील, जिजाबराव गढरी, रायभान पाटील, धुडकू पाटील, शांताराम चौधरी, राजेंद्र ठाकरे ग्रामपंचायत उपसरपंच शरद पाठक ग्रामपंचायत सदस्य रवींद्र पाटील देखरेख संघाचे माजी संचालक सुरेश पाटील, गजानन पाटील, दिलीप ठाकरे, संस्थेचे सचिव भगवान कोळी, पत्रकार शालीग्राम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. फरकांडे विकास सोसायटीची जुनी इमारत अतिशय जीर्ण झाली होती. सभासदांच्या वर्गणीतून व लोकसहभागातून नवीन इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. संस्थेच्या बांधकामासाठी कोणतेही शासकीय अनुदान नसल्याने परिसरातील नागरिकांनी सहकार्य करण्याचे आव्हान संस्थेचे चेअरमन समाधान पाटील यांनी केले आहे.