चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील अनवर्दे खुर्द येथील रहिवासी शेतकरी पंडित डोमन रायसिंग( वय- 65 )या शेतकऱ्याचा शेतातील कडब्यालाअचानक आग लागल्याने आगीच्या झळा बसून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली.
याबाबत प्राथमिक प्राप्त माहिती अशी की, शेतकरी पंडित डोमन रायसिंग हे आपल्या हातेड शिवारातील शेताचे शेती मशागतीची कामे करण्याच्या गेले होते काम करीत असतांना शेतातील कडब्याला अचानक आग लागल्याने ते पडायला लागले .धुराच्या व आगीच्या तडाख्यात सापडल्याने ते काही अंशी जळून जमीनवर कोसळले असावेत असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.ते दुपारपर्यंत घरी न आल्याने त्यांना शेतात बघायला गेले असता मयत स्थितीत आढळून आले. ही वार्ता येऊन धडकताच भाऊबंदकीतील शेताकडे धाव घेत मृतदेह घरी आणल्याने गाव शोकसागरात बुडाले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा व २ मुली असा परिवार आहे त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.१८रोजी सकाळी १०वाजता अनवर्दे खुर्द गावी राहत्या घरापासून निघणार आहे.