जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा यांचे जळगाव येथे एक दिवसीय कॅम्प साठी आपल्या कार्यालयातील व अधिकारी कर्मचाऱ्यासह आले असता अल्पबचत भवन,जिल्हाअधिकारी कार्यालय,जळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना जळगाव शहर व जिल्ह्यातील ईदगाह, कब्रस्तान, मशीद व दर्गा इत्यादी बाबत संयुक्तपणे एक निवेदन मुस्लिम इदगाह कब्रस्तान ट्रस्टचे सचिव फारूक शेख यांनी सुपूर्द केले त्या पूर्वी सभागृहात सर्वासमक्ष त्याचे वाचन केले.
विविध विश्वस्त संस्थेच्या मागण्या
वक्फ मंडळाला पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी (शासकीय) यांची नियुक्ती करा, जळगाव येथील खाजामिया दर्गा वक्फ जमिनीवर अनधिकृत कब्जेदार यांची त्वरीत हकालपट्टी करा., प्रत्येक जिल्ह्याला वक्फ कार्यालया ची स्थापना करा., वक्फ मंडळातर्फे मशिदीचे इमाम व मौज्जन यांना पगार किंवा मानधन सुरू करा., मंडळाकडे २००४ पासून बदल अर्ज व नोंदणी अर्ज मंजूर झालेले नाही त्या बाबत त्वरित कारवाई करा., मंडळातील कर्मचारी, पर्यवेक्षक व अधिकाऱ्यांच्या जागा कंत्राटी पद्धतीने त्वरित भरण्यात याव्या., मंडळात जनसंपर्क अधिकारी- चौकशी अधिकारी- किंवा माहिती अधिकारी यांची नियुक्ती करावी., वक्फ कलम ५१ चे उल्लंघन करून वक्फ हस्तांतरित केलेल्या मिळकती पुन्हा परत मिळवणे कामे मंडळाने त्वरित आवश्यक ती कारवाई करावी., वक्फ कार्यालय औरंगाबाद येथे आल्यावर विश्वस्ता सोबत जो भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न वक्फ कर्मचारी करतात त्यावर त्वरित आळा घाला. सदर मागण्यांबाबत अध्यक्षांतर्फे सकारात्मक आश्वासन सदर निवेदनावर उपस्थित जनसमुदाया समक्ष वक्फ मंडळाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा यांनी सभागृहात घोषणा केली , तीन महिन्याच्या आत जळगाव येथे वक्फ मंडळाचे कार्यालय सुरू करण्यात येईल, त्याचप्रमाणे बदल अर्ज व नोंदणीचे अर्जा बाबत ऑनलाईन पद्धतीने त्वरित मंजुरी देण्यात येईल वक्फ मंडळाला स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत वाढल्यास मशिदीच्या इमाम व मौअज्जन यांना मानधन देण्याचा विचार करण्यात येईल., जळगाव खाजामिया प्रकरणातील असलेल्या अतिक्रमण व खाजगी व्यक्तींनी केलेला ताबा काढण्यासाठी मंडळ आवश्यक ती कायदेशीर कारवाई करेल., शासकीय मुख्य कार्यकारी अधिकारी पूर्ण वेळ मिळण्यासाठी शासनाकडे तगादा चालू असून लवकरच पूर्ण वेळ अधिकारी मिळेल. शासनाने मंडळाला १७० जागा भरण्याची परवानगी दिलेली असून लवकरात या जागा भरण्यात येईल. मंडळात कामानिमित्त आल्यावर जो काही भ्रष्टाचार होत असतो त्यावर अंकुश लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.
ईदगाह ट्रस्ट तर्फे सत्कार
सर्व प्रथम प्राथमिक स्वसरूपात जळगाव मुस्लिम ईदगाह ट्रस्ट तर्फे अध्यक्ष वजाहत मिर्झा यांचा सचिव फारूक शेख, मजहर खान व इकबाल बागवान यांनी शाल व बुके देऊन प्रतिक स्वरूपात सत्कार केला मुफ्ती अतिकुर रहेमान,मुफ्ती हारुन नदवी,निवृत्त उप जिल्हाअधिकारी तथा ओ एस डी साजिद पठाण,धुळे चे नगर सेवक साबीर शेख, जिल्हा अध्यक्ष मजहर खान,अमजद पठाण,जमील शेख आदींची उपस्थिती होती.