चोपडा (प्रतिनिधी) जुन्या काळात सन-१९६२ मध्ये दुष्काळमध्ये चोपडा तालुक्यात भीषण दुष्काळ पडला होता. तेंव्हा जैन समाजाने अवघ्या एक रुपयात भाकरी देऊन सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची भूक भागविली. त्यानंतर १९७२ मध्ये दुसऱ्यांदा दुष्काळ पडला त्यावेळी रोटरी क्लबने देखील एक रुपयात भाकरी देऊन संकटात मदत केली. प्रेरणा दर्पण फाउंडेशन संस्थेने फक्त २० रुपयात जेवण देण्याचा संकल्प करून कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली यामुळे इतरांना प्रेरणा मिळाली. परंतू लोकशाहीत उपाशी असलेल्या माणसाची भूक भागवून भीती दूर झाली पाहिजे असे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी यांनी केले.
शहरातील प्रेरणा दर्पण फाऊंडेशनच्या अन्नसेवा वाटा खारीचा कार्यक्रमातंर्गत गोरगरीब व गरजूंसाठी नाममात्र २० रुपयांत भाजी, पोळी, डाळ व भात असे जेवण देण्याच्या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी प्रा.अरुणभाई गुजराथी बोलत होते. अन्नसेवा उपक्रमाचा प्रेरणा दर्पण फाऊंडेशन चे उपाध्यक्ष डॉ.निर्मल टाटीया, सपना टाटीया यांच्याहस्ते आज दि.२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता जुने जतन हॉस्पिटल खराती गल्ली, गोल्ड हाऊस जवळ शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी माजी आमदार कैलास पाटील, चोसाकाचे माजी चेअरमन अँड. घनशाम पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अँड.संदीप पाटील, जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, पीपल बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, व्हॉ.चेअरमन प्रवीण गुजराथी, संचालक नेमीचंद जैन, पं.स.सभापती कल्पना पाटील, डॉ.पराग पाटील, डॉ.चंद्रकांत बारेला, जेष्ठ कार्यकर्ते सुभाष बरडीया, मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल वानखेडे, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ.निर्मल टाटीया यांनी केले तर सुत्रसंचलन संजय बारी सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष श्याम जाधव, उपाध्यक्ष निर्मल टाटीया, सचिव लतीश जैन, हिरेंद्र साळी, विश्वास वाडे, निलेश जाधव आकाश जैन, कुंदन जाधव यांनी परिश्रम घेतले.