जळगाव (प्रतिनिधी) ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांचा स्क्रीन टाईम खूप वाढला आहे. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे पालकांनी पाल्यांना मैदानावर खेळण्यासाठी पाठवावे जेणे करून मानसिक आणि शारिरीक विकास होईल. यश-अपयश पचविण्याची क्षमतासुद्धा विकास होईल. सकस आहार, मैदानी खेळ खूप महत्त्वाचे असून त्यासाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहित करावे असे आवाहन मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांनी केले. जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा उन्हाळी शिबीराचा (समर कॅम्प) समारोपाप्रसंगी त्याबोलत होत्या.
जैन स्पोर्टस अकॅडमीच्या विद्या इंग्लीश स्कूलजवळील मैदानावर झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर जैन इरिगेशन स्टिस्टिमच्या वतीने अविनाश जैन, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व्हाईस प्रेसिडेंट एस. टी. खैरनार, सदस्य यूसूफ मकरा, जैन स्पोर्टस अकॅडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे उपस्थित होते. क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिटन, बॉस्कटेबॉल या खेळामध्ये 250 खेळाडूंनी सहभाग घेतला. मान्यवरांच्या उपस्थित समर कॅम्पमधील सहभागी खेळाडूंचा क्रीडा साहित्य, प्रमाणपत्र, ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. जैन इरिगेशन प्रायोजित समर कॅम्प अनुभूती इंटरनॅशनल स्कूल येथे पार पडला. सुरवातीला क्रिकेट उन्हाळी शिबिर 15 एप्रिल ते 8 मे दरम्यान आयोजित करण्यात आले. त्यानंतर इतर क्रीडा प्रकारात 1 ते 22 मे आयोजित झाले.
समर कॅम्पमधील खेळाडूंचा सन्मान
क्रिकेट मध्ये सामनावीर पुरस्काराने आर्यन निमकर, उत्सव अग्रवाल, पुनीत तलरेजा, प्रणव सुवर्णकर, वंश अग्रवाल, भग्याम मणियार, पर्व जैन, वरद चौधरी, शिऱ्या गुरूचल, विनीत काटकर, प्रथमेश जैन, जयंत झुरके, कल्याण चौधरी, प्रशांत बागुल, ओम सवांदे, योग मराठे, केवल नाथ, रूद्रांश सोनवणे, अलोक राजेपावर, साईनील बाविस्कर सन्मानित करण्यात आले. विशेष पारितोषिकाने साईनील बाविस्कर, सुधांशु भिराडे, ओम सावंदे यांना गौरविण्यात आले. कनिष्ठ गट उत्कृष्ट फलंदाज पर्व जैन, उत्कृष्ट गोलंदाज कृष्णा झुर्के, उत्कृष्ट यष्टिरक्षक भग्याम मणियार, उत्कृष्ट सकारात्मक देहबोली सुयश पाटील, गट उत्कृष्ट फलंदाज योग मराठे, उत्कृष्ट गोलंदाज श्रीया गुरुचल, उत्कृष्ट सकारात्मक देहबोली राणी काकडे, उत्कृष्ट शिबिरार्थी भग्याम मणियार यांचा सन्मान करण्यात आला. बॅडमिटनमध्ये अर्श शेख (विजयी) शुभम चांदसरकार (उपविजेता), साची गांधी (विजयी), सानिका पाटील (उपविजेता), कनिष्ठ गट करण पाटील (विजयी), देव वेद (उपविजेता), वेणु मोरांकर (विजय), शिवांशी झोपे (उपविजेता), उत्कृष्ट खेळाडू कनिष्ठ गट यदनेश साळी, पलक महाजन, वरिष्ठ गट हिमांशू वर्मा, शुभम चांदसरकार यांना सन्मानित करण्यात आले. फुटबॉलमध्ये उत्कृष्ट बचाव खेळाडू अश्विन पवार, बेस्ट हाफ अर्णव शाह, बेस्ट स्ट्रिकर पियूष वराडे, बेस्ट गोलकिपर निखिल पाटील, डिसपीलन रणवीरसिंह पाटील, सर्वाउत्कृष्ट उद्योमुख खेळाडू योगीत बोट्वानी यांनी गौरविण्यात आले. बास्केटबॉलमध्ये कनिष्ठ गट उत्कृष्ट शिबिरार्थी यश सोनवणे, पूर्वा हटकर, वरिष्ठ गट तुषार बेनवाल, प्रतीक्षा नन्नवरे, सर्वाउत्कृष्ट उद्योमुख खेळाडू तिलक रील, सोनल हटकर यांचा सन्मान करण्यात आला.
युसूफ मकरा यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन व आभार वरूण देशपांडे यांनी केले. मुश्ताक अली यांनी समर कॅम्पविषयी मनोगत व्यक्त केले. जैन इरिगेशन सिस्टिम लि. प्रायोजित जैन स्पोर्टस अकॅडमीच्या समर कॅम्प-2022 जैन स्पोर्टस अकॅडमीचे संचालक अतुल जैन यांच्या मार्गदर्शनातून साकारण्यात आला. यशस्वीतेसाठी समन्वयक अरविंद देशपांडे, रवि धर्माधिकारी, सर्व प्रशिक्षक आणि जैन इरिगेशनमधील सहकाऱ्यांनी सहकार्य केले.