मुंबई वृत्तसंस्था एकनाथ शिंदे यांचा बंड इतिहासात कायम आठवणीत ठेवला जाईल, कारण या बंडामुळे आज महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडात सहभागी झालेले प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांना रस्ता गैरव्यवहार प्रकरणात क्लीन चीट दिल्याचे आता समोर आले आहे.तिकडे मविआ सरकार कोसळले आणि इकडे बच्चू कडू यांची फाईल बंद झाली, त्यामुळे अनेक चर्चा सध्या राजकारणात रंगत आहेत.
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना एका गैरव्यवहार प्रकरणी क्लीन चीट देण्यात आली आहे. अस्तित्त्वातच नसलेल्या तीन रस्त्यांच्या कामात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप बच्चू कडूवर होता. एकूण १ कोटी ९५ लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार बच्चू कडू यांनी केला होता. हे संपूर्ण प्रकरण कोर्टातही गेलं होतं. बच्चू कडू यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी फकवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
दरम्यान या प्रकरणी अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांमध्ये फसवणुकीचा गुन्हा कडू यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला होता. प्रकरणातून बच्चू कडू यांची निर्दोष मुक्तता झाली असून बच्चू कडू यांच्याविरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्याने पोलिसांनी या प्रकरणाची फाईल बंद केली आहे.आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची ही फाईल आता पोलिसांनी बंद केल्याची माहिती समोर आली. .