TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वसीम रिजवी विरोधात जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल

भादवी १५३अ व ब तसेच २९५ व २९८ प्रमाणे कारवाई करा - मानियार बिरादरीचे अध्यक्ष

The Clear News Desk by The Clear News Desk
March 16, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सय्यद वसीम रिजवी यांच्या वक्तव्यामुळे जगात भारत देशाची प्रतिमा डागळत आहे. त्यामुळे देशात अराजकता पसरवण्याचे हे षड्यंत्र असल्याने सय्यद वसीम रिजवी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी, अशी फिर्याद जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख अब्दुल्ला यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांना प्रत्यक्ष भेटून तक्रार अर्ज दाखल केला आहे.

सैयद वसीम रिजवी, माजी अध्यक्ष, शिया वक्फ बोर्ड, उत्तर प्रदेश, लखनौ यांनी सर्वोच्च न्यायालयात पवित्र कुराणातील २६ श्लोक वगळण्यासाठी जनहित याचिका दाखल केली, सदर जनहित याचिका न्यायप्रविष्ट असल्याने त्याचे उत्तर आम्ही न्यायालयात देऊ परंतु वसीम रिजवी हे न्यायालयीन सादर प्रकरणाची माहिती बाहेर इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया व प्रिंट मीडिया यांना प्रसारित करून प्रसिद्ध करून ते आमच्या इस्लाम धर्माची बदनामी करीत आहेत. तसेच दोन समाजात हिंदू व मुस्लिममध्ये तेढ निर्माण करून वेगवेगळ्या गटात खास करून शीया, सुनीं, बोहरा, देवबंदी, बरेलवी, अहेले हदीस व इतर गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करीत आहेत.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

आज संपूर्ण जग हे कोविडशी लढत असताना एकत्रित आलेला आहे. त्यामुळे समाजामध्ये गोडवा निर्माण झालेला असताना रिजवी यांच्या वक्तव्याने समाजातील मधुरता नष्ट होत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या समाजात व गटात तणाव निर्माण होऊन अशांतता पसरविण्याचा प्रयत्न रिजवी करीत आहेत व त्यांच्या या प्रयत्नामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचत आहे. त्यामुळे भारत देशातच नव्हे तर जगभरातील मुस्लिमांच्या भावना त्यामुळे दुखावल्या आहेत.

सय्यद वसीम रिजवी यांच्या वक्तव्यामुळे जगात भारत देशाची प्रतिमा डागळत आहे. त्यामुळे देशात अराजकता पसरवण्याचे हे षड्यंत्र असल्याने सय्यद वसीम रिजवी यांच्यावर भारतीय दंड विधान कलम १५३ अ, ब,२९५, २९८ व ५०० प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी अशा आशयाची लेखी फिर्याद जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख अब्दुल्ला यांनी १५ मार्च २१, सोमवार रोजी संध्याकाळी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांना प्रत्यक्ष भेटून समक्ष लिहून दिलेली आहे. सदर प्रकरणी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक रामकृष्ण पवार यांनी सांगितले. सदर तक्रारीची प्रत जिल्हा दंडाधिकारी व पोलीस अधीक्षक जळगाव यांना सुद्धा दिलेली आहे

कोर्टात न्याय मागणार

जळगाव पोलिसांनी आठ दिवसात योग्य ती कायदेशीर कारवाई न केल्यास सदर प्रकरणी जळगाव न्यायालयात तक्रार दाखल करण्यात येईल व न्यायालयातून योग्य ते आदेश प्राप्त करण्यात येईल, असे मानियार बिरदारीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी आपल्या पत्रकात नमूद केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
Next Post

सरकारचं कोरोनावर की कोरोनाचं सरकारवर प्रेम आहे ? : मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोविड रुग्णालयांकडेही वीजबिलाची थकबाकी

January 28, 2022

मोटारसायकल घेण्यासाठी विवाहितेचा छळ

February 10, 2021

आमचे ‘व्होट’ सरकार होते, ‘नोट’ नव्हे : कमलनाथ

September 19, 2020

चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे वाल्मिक पाटील, सोनल हटकर व मनिषा हटकर या तिघांची तांत्रिक अधिकारीपदी निवड

May 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group