नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंजाब काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप घडला आहे. याठिकाणी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा दिला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राज्यपालांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान, अमरिंदर सिंह यांच्या विरोधात ४० आमदारांनी दंड थोपटल्यानंतर आज संध्याकाळी काँग्रेसने तातडीची बैठक बोलावली आहे. यात विधीमंडळ नेता निवडण्यात येणार आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रवीन ठुकराल यांनी दिली आहे.
मला अपमानित झाल्यासारखं वाटतं – कॅप्टन
‘दोन महिन्यात काँग्रेस आमदारांची दिल्लीत तिसऱ्यांदा बैठक बोलावण्यात आली आहे. याचा अर्थ असा की आता माझ्यावर विश्वास राहिला नाही किंवा मी सरकार चालवू शकलो नाही. मात्र, यामुळे मला अपमानित झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. आता हवं त्याला मुख्यमंत्री करा’, अशी संतप्त प्रतिक्रिया कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी दिली आहे. त्यामुळे आता कॅप्टनबाबत काँग्रेस नेतृत्व काय भूमिका घेणार? याकडेही संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.