मुंबई (वृत्तसंस्था) संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचे संकट घोंगावत असल्याने शाळा बंद आहेत. मुलांचं शिक्षण हे दीड वर्षांपासून ऑनलाइन पद्धतीनेच सुरू आहे. त्यातच शाळा नेमक्या कधी सुरू होणार हा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांनाही पडलेला आहे. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागानं राज्यातील कोरोनामुक्त भागातील ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत एक शासन निर्णय जारी केला आहे.
मार्गदर्शक सूचना
संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी, असं शासनाकडून सांगण्यात आलं आहे.
१) शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती सतत राखणे;
शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे.
Thermometer, जंतूनाशक, साबण पाणी इत्यादी आवश्यक वस्तुंची उपलब्धता तसेच शाळेची – स्वच्छता व निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशासनाने (ग्रामीण व शहरी) सुनिश्चित करावी. वापरण्यात येणारे thermometer हे calibrated contactless infrared digital thermometer असावे.
• एखाद्या शाळेत क्वारंटाईन सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी स्थानापन्न करावे. स्थानिक प्रशासनाने अशा शाळेचे हस्तांतरण शाळा व्यवस्थापनाकडे करण्यापूर्वी त्याचे पूर्णत: निर्जंतुकीकरण करावे.
. क्वारंटाईन सेंटर इतर ठिकाणी नेणे शक्य नसल्यास शाळा खुल्या परिसरात किंवा इतर ठिकाणी भरवावी.
२) शिक्षकांची कोविड-१९ बाबतची चाचणी:
संबंधित शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोविड- १९ साठीची RTPCR / RAPID ANTIGEN चाचणी करावी.
३) बैठक व्यवस्था :
• वर्गखोली तसेच स्टाफ रुम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतरच्या नियमांनुसार असावी.
वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी.