TheClearNews.Com
Tuesday, April 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जाणून घ्या… गांजाने भरलेला ट्रक नांदेडला पकडला मग जळगावचे नाव का आले समोर?

समीर वानखेडेंनी नेमकी काय दिली माहिती? ; एएनआयच्या ट्वीटमुळे कसा उडाला गोंधळ !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 15, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एरंडोलजवळ गांजाचा ट्रक पकडल्याचे ट्वीट ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने सकाळी केल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. परंतू हा गांजाने भरलेला ट्रक एरंडोलजवळ नव्हे तर नांदेड जिल्ह्यात पकडण्यात आल्याची माहिती दुपारी एनसीबी मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांनी दिली आहे. दरम्यान, एएनआयच्या ट्वीटमध्ये चुकून ज्या ठिकाणी ट्रक सापडला, त्याऐवजी ज्या ठिकाणी हा ट्रक जाणार होता म्हणजेच जळगाव जवळील एरंडोलचे नाव टाकले गेल्यामुळे गोंधळ उडाला होता. तर हा ट्रक एरंडोलनंतर महाराष्ट्रात इतर ठिकाणी गांजाचे वितरण करणार असल्याची माहिती काही माध्यमांनी नुकतीच दिली आहे.

 

READ ALSO

दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!

महावितरणकडून ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर; केंद्रीय राज्यमंत्री श्री.नाईक यांनी केले कौतुक

एएनआय वृत्तसंस्थेने सोमवारी सकाळी द्विट केले करत जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ मुंबई एनसीबीच्या पथकाने तब्बल १५०० किलो गांजा पकडल्याची माहिती दिली होती. जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे मात्र, अशी कोणतीही कारवाई जळगाव जिल्ह्यात झाली नसल्याची माहिती माध्यमांना दिली. तर दुसरीकडे ‘आमच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई झालेली आहे परंतु ती मुंबईच्या पथकाने केली असल्याचे नांदेड जिल्ह्यातील नायगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अभिषेक शिंदे यांनी माध्यमांना सांगितले. तसेच हा गांजा एरंडोल येथे जात असताना रस्त्यातच पथकाने पकडल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली.

 

नांदेडमध्ये नेमकी काय कारवाई झाली?

 

मुंबई एनसीबीने नांदेड जिल्ह्यातील नांदेड-हैदराबाद मार्गावर मंजराम (तालुका – नायगाव) येथे कारवाई केली. गुप्त माहिती मिळाल्यानंतर एनसीबीने विशेष मोहीम राबवत ही कारवाई केली. १५ नोव्हेंबरला पहाटेच्या वेळी केलेल्या या कारवाईत एनसीबीने १२ चाकी ट्रक ताब्यात घेतला. यातून एकूण 1127 किलोग्रॅम गांजा जप्त केला. तसेच २ आरोपींना अटक केली. आता आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे, अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिलीय. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील एरंडोलनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर गांजाचे वितरण होणार होते, अशी माहिती आता समोर येत आहे.

 

ट्रकमधील गांजा नांदेडमधून जळगावला येणार होता

ट्रकमधील हा गांजा नांदेडमधून जळगावला जाणार होता. तिथं यातील काही गांजा देऊन ही गाडी पुढे महाराष्ट्रभरात गांजाचं वितरण करणार होती. ही मुंबई एनसीबीने केलेल्या सर्वात मोठ्या कारवाईपैकी एक मानली जात आहे. या प्रकरणी एनसीबीने ९८/२०२१ या क्रमांकाने गुन्हा नोंद केला आहे. हा माल कुणाला पोहचवला जाणार होता याचा तपास सुरू आहे. लवकरच यातील इतर तस्करांनाही अटक केली जाण्याची शक्यता आहे.

 

एएनआयच्या ट्वीटमुळे कसा उडाला गोंधळ !

 

दरम्यान, एएनआयच्या ट्वीटमध्ये चुकून ज्या ठिकाणी ट्रक सापडला, त्याऐवजी ज्या ठिकाणी हा ट्रक जाणार होता म्हणजेच जळगाव जवळील एरंडोलचे नाव टाकले गेल्यामुळे गोंधळ उडाला होता. परंतू या ट्रकमधील काही प्रमाणातील गांजा एरंडोल येथे येणार होता, हे आता समोर आले आहे. एरंडोलजवळील वनकोठा येथील एक व्यक्ती हा गांजाचा मोठा तस्कर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘नंदू’ नामक हा व्यक्ती अनेक वर्षापासून हा धंदा करतो, असेही माहिती सूत्रांनी दिलीय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!

April 7, 2026
जळगाव

महावितरणकडून ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर; केंद्रीय राज्यमंत्री श्री.नाईक यांनी केले कौतुक

April 7, 2026
गुन्हे

जळगावात मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळा प्रकरणात १२ कोटींचा गैरव्यवहार? 

April 7, 2026
जळगाव

जिल्हास्तरीय लोकशाही दिनातून तक्रार निवारणाला गती

April 7, 2026
जळगाव

भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात ; राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती

April 6, 2026
जळगाव

सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन (CGD) नेटवर्कचा विस्तार : राज्यस्तरीय बैठक संपन्न

April 6, 2026
Next Post

अमरावतीत दंगल घडविण्यासाठी मुंबईतून पैसे पाठवले : नवाब मलिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव येथे १२ जून रोजी मोफत भव्य हृदयरोग, ईसीजी तपासणी शिबिराचे आयोजन

June 10, 2022

काँग्रेसला दूर सारून देशाला बळकट करणाऱ्या पक्षाला जनतेने निवडून द्यावे : नरेंद्र मोदी !

October 4, 2024

खळबळजनक : गिरणा नदी पात्रात तरुणाचा निर्घृण खून ; धरणगाव पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

June 24, 2023

पुढच्या १० दिवसांत दिल्लीतील कोरोना नियंत्रणात येण्याची शक्यता : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

November 13, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group