जळगाव (प्रतिनिधी) शिवसेनेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर रविवारी रात्री गोळीबार झाला होता. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसांनी काल दोन जणांना अटक केली होती. या दोघांना आज न्यायालयात हजर केले असता २९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. उमेश पांडूरंग राजपूत (पाटील) वय २८ रा. शिंदे नगर, पिंप्राळा जळगाव आणि किरण शरद राजपूत (पाटील) (वय-२४) रा. पांडूरंग नगर, पिंप्राळा जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, रविवारी २५ जुलै रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर इनोव्हातून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार करून पळ काढला. यात सुदैवाने त्यांना काही झाले नाही. कुलभूषण पाटील यांनी रात्री उशीरा रामानंदनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. यानुसार रात्री उशीरा कुलभूषण वीरभान पाटील यांनी रामानंदनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यानुसार महेंद्र राजपुत, उमेश राजपुत, मंगल राजपुत आणि बिहऱ्हाडे (पुर्ण नाव माहीत नाही) सर्व रा. पिंप्राळा परिसर यांच्या विरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील दोन संशयित आरोपी उमेश पांडूरंग राजपूत आणि किरण शरद राजपूत रा. पिंप्राळा जळगाव यांना रामानंद नगर पोलीसांनी काल सोमवारी जामनेर तालुक्यातील मालखेडा येथून अटक केली होती.
आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी
उमेश पांडूरंग राजपूत (पाटील) वय २८ रा. शिंदे नगर, पिंप्राळा जळगाव आणि किरण शरद राजपूत (पाटील) (वय-२४) रा. पांडूरंग नगर, पिंप्राळा जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची म्हणजे २९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास स.पो.नि. संदीप परदेशी करत आहेत.