TheClearNews.Com
Sunday, November 2, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनुभवमऺटप भारतातील पहिली लोकशाही संसद !

vijay waghmare by vijay waghmare
May 11, 2024
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव : अक्षय तृतीयेला संत महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी केली जाते. त्यांचा जन्म कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगलेश्वर बागेवाडी या गावात थोर शिवभक्त मादिराज व मादलंबिका यांच्या पोटी झाला आणि तो सामाजिक क्रांतीचा दिवस ठरला. कर्नाटक ,महाराष्ट्र आणि तेलंगणा,आंध्र प्रदेश या भागात मोठ्या उत्साहात महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी केली जाते. 26 एप्रिल 2001 पासून महात्मा बसवेश्वर यांची शासकीय जयंती महाराष्ट्रात साजरी होते. 2002 मध्ये कर्नाटकमध्ये तर 2003 मध्ये तेलंगणा आणि 2016 पासून आंध्र प्रदेशात शासकीय जयंती साजरी होते. महात्मा बसवेश्वरांचे चरित्र इयत्ता पाचवी सातवी व नववी यांच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आले तर महाविद्यालय स्तरावर संशोधन स्वरूपात त्यांच्या चरित्राचा अभ्यास केला जातो.

14 नोव्हेंबर 2015 रोजी महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यांचे उद्घाटन लंडनमध्ये झाले. अशा या क्रांतिकारक विचारांच्या महात्मा बसवेश्वरांच्या जन्माच्या वेळेस समाजामध्ये चातुवर्णी व्यवस्था होती. जातीभेद होता स्त्री पुरुष भेदभाव होता लोक अंधश्रद्धे मध्ये गुरफटून गेलेले होते. महात्मा बसवेश्वर हे शांत चिंतनशील व चिकित्सक वृत्तीचे होते. लहानपणापासूनच समाजातील वाईट चालीरिती, अंधश्रद्धा ,पशु हत्या, मांसाहार जातीभेद या गोष्टींना त्यांचा विरोध होता. परंतु त्यांचा हा विरोध त्यावेळच्या व्यवस्थेला व कुटुंबाला मान्य नव्हता तेव्हा त्यांनी आठ वर्षाचे असताना घर सोडून ज्ञान मिळवण्यासाठी ते कृष्णा व मलप्रभा नद्यांच्या संगमावरील कुंडल संगम येथे गेले तेथे विविध भाषा धर्म तत्त्वज्ञान इत्यादीचा सतत बारा वर्षे त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर त्यांची कीर्ती कुंडल संगम व पंचक्रोशीत झाली सामाजिक व धार्मिक सुधारणा करून आणण्यासाठी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रेरणेतून कल्याण नगरी आजच्या कर्नाटकातील टिपरंभ बसवकल्याण बिदर जिल्हा येथे भारतातील पहिली लोकशाही संसद स्थापन झाली, त्यालाच अनुभवमऺटप असे म्हटले जाते. महान तत्वज्ञानी अलमदेव प्रभू हे त्या मंटपाचे अध्यक्ष होते.

READ ALSO

स्वर्गीय मित्राच्या आठवणीत जीपीएस गृपने दत्तक घेतली पाळधीतील स्मशानभूमी

२३ वर्षांनंतर धरणगाव कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचे गेट टू गेदर उत्साहात

या अनुभव मंडपात अनेक जातीतून सभासद सामील झालेले होते जात माडीवाळ माची देव धोबी, मेदार केत्तया बुरूड, शिवनाथ मथ्यार महार शंकर दासीमय्या शिंपी, समगार हराळ्या चांभार, मधुवरस ब्राह्मण यासारखे पुरुष शरण व हजारो महिला शरणी ज्यात कक्कया, अक्का महादेवी, अक्का नागम्मा या विद्वान स्त्रीया तर सुळे पद्मलदेवी, सुळे चामलदेवी यासारख्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया बसवांण्णाच्या विचाराने प्रभावित होऊन शरणी झाल्या. अनुभव मंडप स्थापन करणे यामागे उद्दिष्ट होते की, जातीयता उच्चनीचतेचे निर्मूलन करणे. एकेश्वर वाद ,श्रमाचे महत्त्व पटवून देणे मानवी हक्क स्त्री पुरुष समानता आर्थिक धार्मिक आणि सामाजिक स्वातंत्र्य सद्गुण सदाचाराचा प्राधान्य जन्म जातीभेद नष्ट करणे प्रत्येकाला व्यवसायाचे निवडीचे स्वातंत्र्यज्ञाने विषमता नष्ट करणे समान न्यायाचे आचरण ठेवणे. प्राणी मात्रांविषयी दयाभाव ठेवणे लोक भाषेत वचन साहित्य निर्माण करणे विश्वबंधुत्वाची भावना वाढीस लावणे स्वातंत्र्य समता बंधुत्व सामाजिक न्याय ही उद्दिष्ट पूर्ण करणे हे अनुभव मंटप स्थापन करण्यामागे बसवेश्वरांची उद्दिष्ट होते. धार्मिक सुधारणेतूनच सामाजिक सुधारणा घडू शकते हे त्यांना माहीत होते. समाजाची अवनीती ही धर्मामुळे होत नाही तर धर्माची तत्वे योग्य रीतीने न पाळल्यामुळे होते ही गोष्ट ते जाणून होते. त्या काळामध्ये लोकांवर धर्माचा प्रचंड पगडा होता यांना एकत्र करून धार्मिक सुधारणा व व सुयोग्य विचारांना प्राधान्य देण्यासाठी त्यांना एकत्र करणे आवश्यक होते.

या चळवळीमध्ये सहभागी पुरुष व स्त्रियांना इष्टलिंग दीक्षा देऊन गळ्यात शिवलिंग धारण केल्यानंतर अनुक्रमे शरण व शरणी, असे नाव दिले जात होते. शरण म्हणजे गळ्यात शिवलिंग धारण करून शरण परिवारात राहणारा नित्य वचनांवर विश्वास ठेवणारा सत्य व शुद्ध दासोह करणारा (म्हणजेच आपल्या कमाईतून काही हिस्सा समाजाच्या कल्याणासाठी देवुन समाजातील आर्थिक विषमता नष्ट करणे) तसेच कायक(कर्म )यावर विश्वास ठेवणारा होय. त्यांनी” दासोह “व “कायकवे कैलास “(म्हणजेच मनापासून प्रामाणिकपणे केलेले कष्ट हे ईश्वराच्या प्राप्ती सारखेच आहे, असे त्यांनी सांगितले होते). या दोन मूलमंत्रऻवर खूप भर दिला होता ते अनुयायांना नेहमीच दानधर्म करणे कष्ट करून जगणे ,यावर भर देत होते. त्यांनी श्रमाला व व्यवसायाला मानाचे स्थान प्राप्त करून दिले होते दिवसभर कष्ट करून सर्व अनुयायी सायंकाळी या अनुभव मंडपात एकत्र येत विचारविनिमय व चर्चा करत आणि या विचारातून व चर्चेतून अनेक वचने जन्माला आली जी गद्याच्या रूपामध्ये अस्तित्वात आहेत.

समता स्वातंत्र्य बंधुता क्षमप्रतिष्ठा अभिव्यक्ती स्वातंत्र्य सामाजिक न्याय स्त्री पुरुष समानता ही मूल्य या शरणांच्या समताधिष्ठित वचनात दिसून येतात त्या काळात महात्मा बसवेश्वरांनी शरणींना म्हणजेच स्त्रियांना अनुभव मंटपात 50 टक्के आरक्षण दिले होते विधवा विवाह , वैचारिक स्वातंत्र्य, आंतरजातीय विवाह यांना मान्यता दिली होती. या संसदेमध्ये सर्व स्तरातील स्त्रिया शरणी म्हणून राहत होत्या. यामध्ये विद्वान स्त्रिया ज्यामध्ये अक्क नागम्मा, अक्का महादेवी ज्यांनी अनुभवाच्या आधारावर अनेक वचने लिहिली. तसेच वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया समाजाने ज्यांना नाकारले. अशा स्त्रिया ,तसेच काश्मीरची राजकन्या बोताऺदेवी, अनाथ स्त्रिया या सर्वांना या अनुभव मंडपात सन्मानाने वागवण्यात आले होते त्यांचे विचार हे महत्वपूर्ण मानले जात होते. महात्मा बसवेश्वरांनी या सर्व शरण आणि शरणी यांना सदाचार, निती नियमांचे पालन सत्यता, परावलंबी न राहता कष्ट करून जगणे समाजाची सेवा करणे चोरी न करणे अनाचार न करणे हे वचनांच्या माध्यमातून व विचारांच्या देवाणघेवाणीतून समजावून सांगितले.

बसवेश्वरांचे वचन !

“चोरी करू नको, हत्या करू नको ,खोटे बोलू नको, इतरांचा तिरस्कार करू नको ,दुसऱ्यांची निंदा करू नको हीच अंतरऺग शुद्धी ,हीच बहिरंग शुद्धी हेच कुंडल संगम देवाला प्रसन्न करण्याची रीत आहे,”असे उपदेश वाचनाच्या माध्यमातून शरण शरणी यांना दिले.

समाजामध्ये विषमता निर्माण होऊ नये यासाठी संपत्तीचे वाटप योग्य प्रमाणात व्हावे सर्वांना समान संपत्ती मिळावी असे त्यांचे विचार होते. विशिष्ट जातीपातीचे राजकारण न करता संपूर्ण समाजात समानता कशी निर्माण होईल याचा प्रयत्न या अनुभव मंटपातून तयार झालेल्या विविध वचनातून दिसून येतो. संपूर्ण मानवावरचे प्रेम हाच बसवेश्वराच्या तत्त्वज्ञानचे मूलतत्त्व होते. त्यांनी त्यांची वचने कन्नडमध्ये लिहिली होती परंतु काही समाजकंटक यांनी त्यांचे साहित्य नष्ट केले पण जे आहे ते ही समाजात खुप मोठे परीवर्तन घडवून आणेल. तरअक्कमहादेवी यांनी ४००च्या वर वचने लिहिली समाजामध्ये कोणीही श्रेष्ठ नाही व कुणीही कनिष्ठ नाही सगळे समान आहेत सगळे मानव आहेत. आणि मानवांचा जन्म हा मानव उद्धारासाठी झालेला आहे, हीशिकवण त्यांच्या तत्वज्ञानातून मिळते. आजच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता या अनुभव मंटपातील विविध वचनांचा जर प्रत्यक्षात उपयोग आणला तर निश्चितच समाजात स्वातंत्र्य ,समता ,बंधुता निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. आज समाजात शिक्षीत वर्गात बोकाळलेला जातीवाद , सूडबुद्धी, भ्रष्टाचार या अनुभवातून निर्माण झालेल्या, वैचारिक देवाण घेवाणीतून निर्माण झालेल्या वचनातुन निश्चितच सऺपेल अनुभवमऺटप म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीचा पाया होता जो महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकामध्ये सामान्य लोकांमध्ये भक्कम पणे उभा केला. आज महात्मा बसवेश्वरांच्या या समतेच्या विचारांची खूप गरज देशाला आहे.

-प्रा.डॉ.ज्योती पुंजाराम महाजन
कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगाव

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: akshay tritiyadharangaonlokshahi

Related Posts

धरणगाव

स्वर्गीय मित्राच्या आठवणीत जीपीएस गृपने दत्तक घेतली पाळधीतील स्मशानभूमी

October 27, 2025
धरणगाव

२३ वर्षांनंतर धरणगाव कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचे गेट टू गेदर उत्साहात

October 27, 2025
धरणगाव

धरणगाव तालुका भाजपतर्फे बळीराजा पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न

October 24, 2025
धरणगाव

जीपीएस मित्रपरिवार आयोजित, दिपावली स्नेह मिलन सोहळा उत्साहात संपन्न..!

October 23, 2025
धरणगाव

मंत्री म्हणून पोलिसांच्या बळकटीसाठी काम करण्याची संधी – गुलाबराव पाटील

October 19, 2025
जिल्हा प्रशासन

संजयनगरातील ४७४ बेघर नागरिकांना घराचा हक्क मिळावा; नागरीक व बेघर संघर्ष समितीचे निवेदन

October 14, 2025
Next Post

५५ हजारांची लाच भोवली ; मुख्याधिकाऱ्यासह फायरमन अडकले जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘बाईच्या डोक्यावर अपघात झाला आहे का?’ : उर्मिला मातोंडकर

December 30, 2020

दवाखाना सुरू करण्यासाठी 15 लाख माहेरून आणावे म्हणून विवाहितेचा छळ ; वरणगाव पोलिसात सासरच्यांविरुद्ध गुन्हा

May 8, 2022

वाघूर धरण पाणी मागणी अर्ज ५ जूनपूर्वी करण्याचे आवाहन

May 31, 2021

NCB ला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही, ही गंभीर बाब : नवाब मलिक

October 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group