पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेचा मासे विक्रेत्याकडून घरात घुसून विवाहितेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून शंकर अशोक भोई (रा.नगरदेवळा ता.पाचोरा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार २ सप्टेंबर रोजी ४.३० वाजेच्या पिडिता घरी आंगणात एकटी बसलेली होती. यावेळी गावात नेहमी मासे विक्री करणारा शंकर अशोक भोई (रा. नगरदेवळा ता. पाचोरा) हा आला होता. त्याने मासे हवेत का?, अशी विचारणा केली. त्यावर पिडीत महिलेने पतीला फोन लावून मासे घेण्याबाबत विचारणा केली. परंतू पतीने नकार दिल्यामुळे पिडीत विवाहितेने मासे विकत घेण्यास नकार दिला. त्यावर शंकर भोई याने मासे नाही घेतले, किमान मला पाणी तर पाजा. त्यावर पिडीत विवाहितेने त्याला पिण्यासाठी पाणी दिले. पाणी पिऊन झाल्यावर भोई याने विवाहितेचा मोबाईल नंबर मागीतला. परंतु विवाहितेने नकार दिला. यानंतर त्याने पिडीत विवाहितेला जबरदस्ती पकडून घराच्या बाथरुममध्ये घेऊन गेला. भेदरलेल्या विवाहितेने आरडा-ओरडा केला. त्यानंतर भोईने तिथून पळ काढला. घरी आल्यावर पिडीत विवाहितेने सर्व हकीगत पतीला सांगितली. तसेच आपल्या भाऊला मासे विक्रेत्याचे वर्णन सांगितले. यानंतर त्याचे नाव गाव माहित पडले. याप्रकरणी पिडीत विवाहितेच्या फिर्यादीवरून शंकर भोईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स. फो. दिपक वाघ हे करीत आहेत.