धरणगाव(प्रतिनिधी) : येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये आज भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त माजी सैनिक तथा पी.आर.हायस्कूलचे १९६८ च्या बॅचचे माजी विद्यार्थी श्री.नवनीत पुंडलिक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
श्री.नवनीत पाटील हे भारतीय तोफखान्यात १९६९ ला एरंडोल येथे भरती झाले.त्यांनी हैदराबादला सैनिकी प्रशिक्षण घेतले. १९७१ च्या भीषण भारत- पाक युद्धात त्यांचा सुवर्णमंदिर युद्धात सुद्धा सहभाग होता.याशिवाय भारत – बांगलादेश युद्धात सराव शांती सेनेत ते होते. या युद्धात त्यांना दोन वेळा गोळ्या लागून ते जखमी झाले होते. १८ वर्षे देशसेवेसाठी देऊन ते सेवानिवृत्त झाले.
या ध्वजारोहण सोहळ्यात मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे,उपमुख्याध्यापक डॉ.सौ.आशा शिरसाठ, ज्येष्ठ शिक्षक श्री.बी.डी.शिरसाठ, श्री.यू.एस.बोरसे, एनसीसी मेजर श्री.डी.एस.पाटील यांच्या सह शाळेचे शिक्षक बंधू भगिनींनी शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. एनसीसी मेजर श्री.डी.एस.पाटील यांनी परिचय करून दिला. क्रीडा शिक्षक श्री.वाय.ए.पाटील, श्री.एम.डी.परदेशी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.