धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे अन्न व पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांनी आज धरणगावला भेट दिली. यावेळी ना. भुजबळ यांनी सर्वप्रथम माजी आमदार स्व.हरीभाऊ महाजन यांच्या निवासस्थानी भेट सांत्वनपर भेट दिली. त्यानंतर माळी समाज पंच मढीला भेट देत समाजबांधवांचे अभिवादन स्वीकारले.
जळगाव येथे आज ओबीसी परिषद पार पडली. या परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आले होते. जळगावचे कार्यक्रम आटोपल्यानंतर धुळे रवाना होण्यापूर्वी ते धरणगावला थांबले. ना. भुजबळ यांनी सर्वप्रथम माजी आमदार स्व.हरीभाऊ महाजन यांच्या निवासस्थानी भेट सांत्वनपर भेट दिली. मा. आ. महाजन यांचे काही दिवसांपूर्वी हृद्यविकारामुळे निधन झाले होते. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन, माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, उपजिल्हाध्यक्ष दीपक वाघमारे हे उपस्थित होते. यानंतर ना. भुजबळ यांनी माळी समाज पंच मढीला भेट देत समाजबांधवांचे अभिवादन स्वीकारले. तत्पूर्वी चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे यांनी भुजबळ यांचे धरणी परिसरात तर भाजपचे संजय महाजन यांनी माळीवाड्यात स्वागत केले. तसेच माळी समाजाचे जेष्ठ नेते तुळशीराम महाजन ( बापु ), जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भगवान महाजन , शिवसेनेचे विभाग प्रमुख गजानन महाजन, साहेबराव जाधव, वासुदेव महाजन, भुरा भाऊ पाटील यांनी देखील स्वागत केले. यावेळी भुजबळ साहेबांनी माजी नगराधक्ष स्व.डी.एम. माळी सर व मा.आमदार , स्व. हरीभाऊ महाजन यांचा स्मृतींना उजाळा दिला.
















