जळगाव (प्रतिनिधी) शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्टता रामानंद जयप्रकाश व एच ओ डी डॉ. बनसोडे यांचा फुटबॉल असोसिएशन व कोविड केअर युनिटतर्फे सन्मान पत्र, स्मृतिचिन्ह, प्रमाण पत्र, शाल देऊन गौरव करण्यात आले.
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश यांनी जळगाव सामान्य रुग्णालयात तसेच सर्वसामान्य रुग्णासाठी व शासकीय जन आरोग्य सेवांमध्ये जळगाव चा प्रथम क्रमांक मिळविला त्याबद्दल त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. शासकीय महाविद्यालयाचे हेड ऑफ दि डिपार्टमेंट डॉक्टर संजय बनसोडे यांनी दोन महिलांच्या पोटा मधून फुटबॉल एवढ्या व्यासाचे दोन गाठी काढून त्या गरीब महिलांना जीवनदान दिले म्हणून डॉक्टर संजय बनसोडे यांचा सुद्धा सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल देऊन जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन व कोविड केअर युनिट तर्फे सन्मान करण्यात आला.
फुटबॉल असोसिएशन व कोविड केयर युनिटचा संयुक्त कार्यक्रम
जळगाव कोविड केअर युनिट चे अध्यक्ष गफ्फार मलिक, कोविड केअर चे समनव्यक व फुटबॉल असो सचिव फारूक शेख, असो उपाध्यक्ष जफर शेख, इम्तियाज शेख (भुसावळ), अडव्होकेट झाकीर शेख (भोपाळ) तसेच कोविड केअर चे अनिस शाह यांच्या हस्ते व उपस्थित दोघांना सन्मानित करण्यात आले.
शासकीय रुग्णालय सर्वोत्तम, लाभ घ्यावा आव्हान
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत सामान्य रुग्णालयात अत्यंत तज्ञ असे डॉक्टर, मशिनरी,उपलब्ध असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आव्हान अधिष्ठाता डॉ जयप्रकाश, गफ्फार मलिक व फारूक शेख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.