जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मानियार बिरादरीतर्फे कोविड संबंधित रुग्णांच्या रक्त तपासण्यासाठी विविध प्रयोगशाळा अठराशे ते चार हजार रुपयापर्यंत तपासणी फी घेत आहे. त्यावर मानियार बिरादरीने जळगाव येथील निपूण पॅथॉलॉजी लेबरोटरीचे डॉक्टर राहुल मयूर यांच्याशी संपर्क साधून सामाजिक बांधिलकीच्या अधीन राहून त्यांच्याशी या रक्त तपासण्या बाबत चर्चा करून काही अनुदान बिरादरी व काही सहकार्य निपूण लॅबोरिटीने करावे, असे मिळून फक्त १३०० रुपयांमध्ये ही रक्त तपासणी होणार आहे.
तपासणीसाठी खाली तीन ठिकाणी कूपन ठेवण्यात आले असून जळगाव करांनी ते कुपन घेऊन मयूर पॅथॉलॉजी ९,अनंत हौसिंग सोसायटी, एम जे कॉलेज जवळ, ओरीऑन इंग्लिश स्कूलच्या समोर, जळगावमध्ये जाऊन आपल्या रक्ताची तपासणी करून घ्यावी जे रुग्ण जाऊ शकत नाही त्यांचे सॅम्पल आहे. तिथेच घेतले जाईल व लॅबला पाठवण्यात येईल, त्याचे नाममात्र दर आकारले जाईल, असे आव्हान जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
तिन्ही तपासणी साठी संपर्क
रक्त तपासणी फ़क्त १३००रु, रेमडीसीवर ११००रु व एच आर सि टी १८०० रु या तिन्ही तपासणी साठी खालील ठिकाणी कुपन उपलब्ध आहे. कुपन दिल्या शिवाय माफक दरात तपासणी होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
१) जळगाव जिल्हा मानियार बिरादरी रथ चौक जळगाव
२) मुस्लिम ईदगाह व कब्रस्तान कार्यालय, अजिंठा रोड ,जळगाव
३) स्पोर्टस हाऊस, नूतन मराठा शॉपिंग कॉम्प्लेक्स, जळगाव.
अधिक माहितीसाठी ९४२३१८५७८६ किंवा ९४२३४६७७८६ या वर संपर्क साधावा असे आवाहन केलेले आहे.