धरणगाव (प्रतिनिधी) भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त धरणगाव नगरपरिषद कार्यालय येथे नगरपरिषदेच्या महिला सफाई कर्मचाऱ्याच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. दरम्यान, नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच सफाई कर्मचाऱ्यांची हस्ते झेंडावंदन झाले.
नगरपरिषदेवर सध्या प्रशासक नियुक्त झालेले असल्याने झेंडावंदन प्रशासक जनार्दन पवार यांचे हस्ते होणार होते.परंतु प्रशासक तथा मुख्याधिकारी जनार्दन पवार यांचे निर्देशानुसार धरणगाव नगरपरिषदेत गेल्या ३० वर्षाची प्रदीर्घ सेवा बजावून आगामी आठवड्यात सेवानिवृत्त होणाऱ्या महिला सफाई कर्मचारी श्रीमती शोभा गोविंद पटूने यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच सफाई कर्मचाऱ्यांची हस्ते झेंडावंदन झाले.
यावेळी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी नगरसेवक पप्पू भावे ,मा.प्र. नगराध्यक्षा अंजली विसावे, माजी नगरसेविका सुरेखा महाजन, भानुदास विसावे, माजी नगरसेवक कैलास माळी, कार्यालय अधीक्षक संजय मिसर यांच्यासह माजी नगरसेवक, नगरसेविका तसेच नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी व शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.