TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संविधान दिनाचा साकळी ग्रामपंचायतीला ‘ विसर ‘ ! मिलींद जंजाळे यांची तक्रार

The Clear News Desk by The Clear News Desk
November 28, 2020
in यावल, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

साकळी ता.यावल (प्रतिनिधी) येथील ग्रामपंचायत कार्यालयाला दि. २६ नोव्हेंबर २०२० रोजी होणाऱ्या संविधान दिनचा चक्क विसर पडलेला असून या दिन दिलेल्या कुठल्याही नियमाने साजरा न करता या दिनाचा अवमान केलेला आहे. यादरम्यान आज दि.२६ नोव्हेंबर २०२० रोजी साकळी ग्रामपंचायतीची मासिक मीटिंग सुद्धा होती. मात्र या मीटिंग दरम्यान सुद्धा संविधान दिन साजरा करण्याचे कुठलेही औचित्य व शहाणपण संबंधित ग्रा.पं. प्रशासनाने दाखवले नव्हते. मीटिंग संपल्यानंतर अनेक पदाधिकारी यांनी घरचा रस्ता धरला होता. तक्रारदाराच्या तक्रारी काही मोजक्याच पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून ‘नावापुरताच’ व ‘ दिखाऊ’ पद्धतीने संविधान दिन साजरा केला. तरी या प्रकाराची आपल्याकडून सखोल चौकशी होऊन उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांवर कठोरात-कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा माझ्या अर्जावर कुठलाही न्याय न मिळाल्यास मी ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन उपोषणाला बसणार आहे. अश्या आशयाची तक्रार भारिप बहुजन महासंघाचे ता.उपाध्यक्ष मिलींद जंजाळे यांनी वरीष्ठांना दिलेल्या लेखी तक्रारी निवेदनाद्वारे दिलेला आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी सदर प्रकाराचा निषेध केलेला आहे.

या बाबत सविस्तर असे की, मिलींद जंजाळे यांनी दिलेल्या लेखी तक्रारी निवेदनात म्हटले आहे की, दि.२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा दि.२६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने आंबेडकरांचे १२५वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला.संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दि.२४ नोव्हेंबर २००८ ला आदेश काढून ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते. संपूर्ण भारत देशातील जनतेला न्याय,हक्क व कर्तव्याच्या जाणीवेतून मानवतेच्या भावनेने जगण्यासाठी प्रेरीत करणारा असा हा पवित्र ग्रंथ आहे. एवढे महत्व सांगणाऱ्या या संविधानाच्या गौरवार्थ शासनाने घोषित केलेल्या दिवशी म्हणजे दिनांक दि.२६ नोव्हेंबर २०२० रोजी संविधान दिन साजरा करण्याचे शासनाने सुचित केलेले असतांना सुद्धा, साकळी ता. यावल येथील ग्रामपंचायत कार्यालयाला संविधान दिन साजरा करण्याचा चक्क विसर पडलेला आहे.हा दिन दिलेल्या कुठल्याही नियमाने साजरा न करता या दिनाचा अवमान केलेला आहे. यादरम्यान आज दि.२६ नोव्हेंबर २०२० रोजी साकळी ग्रामपंचायतीची मासिक मीटिंग सुद्धा होती. तेव्हा या मीटिंग दरम्यान सुद्धा संविधान दिन साजरा करण्याचे कुठलेही औचित्य व शहाणपण संबंधित ग्रा.पं. प्रशासनाने दाखवले नव्हते .जेव्हा माझ्या लक्षात ही बाब आली तेव्हा मी स्वतः मासिक मीटिंग ठिकाणी जाऊन सरपंच, उपसरपंच,ग्राम विकास अधिकारी व उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांना एक सुज्ञ नागरिक म्हणून चांगलेच खडसावून विचारले की, आज सविधान दिन का साजरा केला नाही ? त्यावर मात्र सरपंचासह उपस्थितांपैकी कोणीही बोलले नाही. तेव्हा माझा संताप अनावर झाला व मी माझा संताप शिवसाळ भाषेतच व्यक्त केला. त्यांना काय लाज वाटली जेव्हा मीटिंग संपली त्यानंतर अनेक पदाधिकारी यांनी घरचा रस्ता धरला.मात्र काही मोजक्याच पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून ‘नावापुरताच’ व ‘दिखाऊ ‘ पद्धतीने संविधान दिन साजरा केला.कारण आजच्या रोजी प्रतिमा पूजन करून संविधान दिन वाचन व्हायला पाहिजे होते. मात्र तसे काही केलेले नाही तेव्हा एकूणच आज साकळी ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने संविधान दिन योग्य प्रकारे साजरा न करता या दिनाचा चक्क अवमानच केलेला आहे तरी या प्रकाराची आपल्याकडून सखोल चौकशी होऊन उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांवर कठोरात -कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आहे.अन्यथा माझ्या अर्जावर कुठलाही न्याय न मिळाल्यास मी ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करुन उपोषणाला बसेल. असा इशारा जंजाळे यांनी तक्रारी निवेदनाद्वारे दिलेला आहे.सदर निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी (जळगाव),प्रांतधिकारी(फैजपूर),जिल्हा पोलिस अधिक्षक (जळगाव),तहसिलदार (यावल),पोलिस निरिक्षक (यावल)साकळी ग्रा.पं.प्रशासन यांना देण्यात आलेल्या आहे.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

भारतीय संविधान दिन पूजनीय- ग्रामपंचायत प्रशासनाला संविधान दिन साजरा करण्याचा विसर पडलेला नसून दि.२६ नोव्हेंबर २०२० रोजी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने संविधान दिन साजरा केलेला आहे .भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून या महत्वाच्या व पूजनिय दिवसाचे स्मरण केलेले आहे. भारतीय संविधान हे आपल्या ग्रामपंचायत प्रशासनासाठी पूजनीय आहे. अशी प्रतिक्रिया प्रभारी ग्रामविकास अधिकारी मकरंद सैंदाणे यांनी दिली

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मार्च 2026 !

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 मार्च 2026 !

March 12, 2026
Next Post

पाच ट्रकमधील बॅटऱ्या चोरीला ; एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ फेब्रुवारी !

February 12, 2023

एकनाथ शिंदेंच्या बंडामागे सचिन जोशी कनेक्शन?, कोण आहेत जोशी ?, कुठे आहेत?

June 25, 2022

बचत गटाचे पैशांबाबत विचारणा केल्याने चौघांकडून मारहाण

July 3, 2025

जळगाव महापालिकेसाठी भाजपचा मोठा शक्तीप्रयोग; वैशाली पाटील भरणार उमेदवारी अर्ज

December 30, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group