चाळीसगाव प्रतिनिधी – शहर विकास आघाडीच्या माजी नगरसेविका व प्रभाग क्रमांक दहा मधून अपक्ष उमेदवारी अर्ज करणाऱ्या सौ अलका सदाशिव गवळी यांनी आज आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तसेच गवळी समाज पदाधिकाऱ्यांच्या शब्दाला मान देत भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ प्रतिभाताई चव्हाण व प्रभाग क्रमांक १० मधील नगरसेवक पदाच्या उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर केला. याबाबत त्यांनी आपल्या पाठिंब्याचे पत्र आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले.
या पाठिंबा पत्रात त्यांनी म्हटले आहे की, चाळीसगाव नगरपालिका निवडणूक साठी मी सौ.अलका सदाशिव गवळी प्रभाग क्र.१० अ मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. मात्र माझ्या उमेदवारी मुळे चाळीसगांव मतदारसंघाचे आमदार श्री.मंगेश दादा चव्हाण यांच्या “द बेस्ट चाळीसगाव” घडविण्याच्या व्हिजनला अडथळा होऊ नये म्हणून मी उमेदवारी न करण्याचा निर्णय माझ्या सद्सद्विवेकबुद्धीने घेत आहे. माझा भारतीय जनता पार्टी च्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.प्रतिभा मंगेश चव्हाण व प्रभागातील सर्व भाजपा अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठींबा मी या पत्राच्या माध्यमातून देत आहे.
माझी प्रभाग क्र.१० मधील सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की, आपले व माझे नाते केवळ राजकीय नसून हे घरचे आपुलकीचे व विश्वासाचे नाते आहे. त्यामुळे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून आपल्या प्रभागाचा आतापर्यंत झालेला विकास व भविष्यात होणारे विकासकामे लक्षात घेता “चाळीसगावच्या भावी पिढ्यासाठी… आम्ही मंगेश दादांच्या पाठी..!” हा विचार घेत उभे राहण्याची हीच योग्य वेळ आहे. चाळीसगाव शहराचा विकास लक्षात घेता सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांना नगराध्यक्ष पदी व भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे ही नम्र विनंती..!
















