चोपडा (प्रतिनिधी) तालुक्याच्या राजकारणात दबदबा असलेलं गाव अशी कठोरा गावाची ओळख आहे. लोकनियुक्त सरपंच पदासाठी इथली निवडणूक प्रचंड चुरशीची झाली. त्यात माजी आमदार कैलास पाटील समर्थक पॅनलचे एकनाथ दामू कोळी यांनी विजय मिळवला.
कठोरा ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या सात जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यात अशोक गोरख पाटील, प्रतिभा पंढरीनाथ पाटील, मीराबाई अमृत कोळी, खटूबाई पंढरीनाथ कोळी, ईश्वर जामसिंग भील, वैभव अरुण धनगर, खुशाल धोंडू भील यांचा समावेश आहे. वाॅर्ड क्रमांक दोनमध्ये दोन जागांसाठी तुल्यबळ लढत झाली. त्यात सुमनताई वसंत पाटील (238 मते), भीमराव पंडीत पानपाटील (339 मते) विजयी झाले. सरपंच पदासाठी झालेल्या मतदानात सात तर सदस्यपदासाठी 11 जणांनी नकारात्मक (नोटा) मतदानाचा अधिकार बजावला. माजी आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल प्रमुखांनी परीश्रम घेतले. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील यांची भेट घेऊन जल्लोष केला.
सरपंचपदासाठी होते सहा उमेदवार !
लोकनियुक्त सरपंच पदासाठी सहा उमेदवार रिंगणात होते. पण खरी लढत तिघांत होती. या चुरशीच्या लढतीत एकनाथ दामू कोळी यांनी 589 मते मिळवून विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी माजी सरपंच बाळू दामू कोळी यांचे सुपुत्र ज्ञानेश्वर कोळी यांना 219 तर भागाबाई चावदस नाईक यांना 309 मते मिळाली.