हरियाणा (वृत्तसंस्था) पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अखेर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे. यासोबतच त्यांनी आपल्या नव्या पक्षाचीही घोषणा केली असून त्यांनी आपल्या नव्या पक्षाचे नाव पंजाब आणि कॉँग्रेस या दोन्ही शब्दांचा वापर करुन ‘पंजाब लोक काँग्रेस’ असे ठेवले आहे.
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपण काँग्रेसचाही राजीनामा देणार असल्याचं अमरिंदर सिंग यापूर्वी सांगितलं होतं. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज अखेर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे. यासोबतच त्यांनी आपल्या नव्या पक्षाचीही घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या नव्या पक्षाला ‘पंजाब लोक काँग्रेस’ असं नाव दिलं आहे. आपण पंजाबमधील सर्व ११७ जागा लढवू असंही त्यांनी सांगितलं होतं. याशिवाय भाजपसोबत युती केली जाईल का नाही यावरही त्यांनी भाष्य केलं होतं. “मी भाजपसोबत युती करण्याबाबत कधीही वक्तव्य केलं नव्हतं. आम्ही सीट शेअर करू शकतो. याबाबत भाजपशी चर्चा झाली नसली तरी यावर विचार करत आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.