भुसावळ (प्रतिनिधी) शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तसेच शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक राजेंद्र देविलाल दायमा (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने आज रोजी दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा मंगळवार, 14 रोजी सकाळी नऊ वाजता राहत्या घरापासून निघेल. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परीवार आहे. ते औरंगाबाद हायकोर्टातील अॅड. निर्मल दायमा यांचे वडील होत. शिवसेनेचा सच्चा व निष्ठावान शिवसैनिक म्हणून राजेंद्र दायमा यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने शिवसैनिकांमध्ये पोकळी निर्माण झाली आहे.