जळगाव (प्रतिनिधी) चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी समाज कल्याण मंत्री नाना बबनराव घोलप २९ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाच्या लग्नसाठी आले होते. यावेळी आगमनप्रसंगी त्यांचे जोरदार फटाके फोडून ठीक ठिकाणी जोरदार घोषणा देत समाज बांधव आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकाऱ्यांनी जंगी स्वागत केले. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे हे उपस्थित होते.
चर्मकार महासंघाचे नेते माजी मंत्री बबनराव घोलप यांचे अमळनेर, धरणगाव ,पाळधी याठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला. तर धरणगाव येथे माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका अंजलीताई विसावे, जिल्हाध्यक्ष सुनीताताई लिंगायत, मोरवकर ताई, लता ताई, कोकिळाताई विसावे यांनी औक्षण केले. याप्रसंगी बेंडाळे रोहिदास महाले, वाघ, संतोष लिंदायेत गुरुजी, बाळा विसावे, साईनाथ विसावे, संजय बंसी, विकास मोरावकर, हरी बंसी, दिलीप मोरे, पप्पू विसावे यांच्यासह चर्मकार समाज बांधव आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.