मुजफ्फरनगर (वृत्तसंस्था) राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह चौधरी यांचे गुरुवारी कोरोनामुळे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून अजित सिंह यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.
२२ एप्रिल रोजी अजित सिंह कोरोना संक्रमित असल्याचं स्पष्ट झालं होतं. मंगळवारी रात्री प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. गुरुग्रामच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, फुफ्फुसात संक्रमण पोहचल्यानं त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. मात्री, त्यांची प्रकृती आणखीनच खालावली आणि उपचारा दरम्यान गुरुवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
माजी पंतप्रधान चरण सिंह चौधरी यांचे पुत्र अजित सिंह चौधरी उत्तर प्रदेशच्या बागपत मतदारघाचं प्रतिनिधित्व करत सात वेळा संसदेत दाखल झाले होते. त्यांनी केंद्रात नागरिक उड्डाण मंत्री पदाची जबाबदारीही हाताळली होती. अजित सिंह यांच्या निधनानं बागपतसहीत पश्चिम उत्तर प्रदेशात शोककळा पसरलीय.