यावल (प्रतिनिधी) शहरातील पंचवटी भागातील रहिवाशी एका ६० वर्षीय वकिलाची ट्रेडिंग प्लेटफॉर्मवर गुंतवणूक करण्याचे सांगून त्यातून चांगले रिटर्न मिळवून देण्याचे आमिष दाखवून अंकिता शर्मा नावाची बतावणी करून अज्ञात महिलेने फसवणूक केली. तब्बल एक लाख दहा हजार रुपये त्यांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यावल शहरात पंचवटी भागात गांधी चौक आहे. या गांधी चौकातील रहिवासी अॅड. राजेश गडे (वय ६०) राहतात. त्यांना दि. २७ जुलै २०२५ रोजी अंकिता शर्मा असे नाव सांगून एका महिलेने संपर्क साधला. त्यानंतर अॅड. राजेश गडे यांना ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून चांगले रिटर्न मिळवून देईल, अशी बतावणी करून त्यांची एक लाख दहा हजार रुपयात फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












