जळगाव (प्रतिनिधी) जॉब देण्याच्या नावाखाली तरुणीची २ लाख ६० हजारात फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव जिल्हापेठ पोलीस स्थानकात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात रविना कैलास बावणे (वय २७ रा. टागोर नगर जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १ जून २०२२ रोजी रविना बावणे या घरी असताना त्यांच्या मोबाईल नंबरवर अज्ञात महिलेने फोन केला. समोरून महीलेने तुम्हाला जाँब मिळेल असे अश्वासन देत रविना यांचा विश्वास संपादन केला. रविना यांना मोबाईल नंबर मागून तसेच बँकेच्या वेगवेगळ्या खात्यावर २ लाख ६० हजार रुपये टाकण्यात सांगितले. या प्रकरणे जॉब न देता फसवणूक केल्याप्रकरणी जळगाव जिल्हापेठ पोलीस स्थानकात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास सपोनि राजेद्र पवार हे करीत आहेत.