जळगाव (प्रतिनिधी) महानगर पालिकेच्या मंजुर नकाशा प्रमाणे बांधकाम न करुन तसेच फ्लॅट बुकिंग वेळी दिलेल्या माहिती पुस्तिका नुसार व नमुद केलेल्या सुख सुविधा न दिल्याप्रकरणी वासुकमल विहारच्या बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गुजराल पेट्रोल पंपाजवळ वासुकमल विहार नावाचे अपार्टमेंट आहे. सौ. कपोले (वय ३२, रा.) यांचा याठिकाणी फ्लॅट आहे. सौ. कपोले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित आरोपी नरेंद्र झिपरूलाल काबरा, लव नरेंद्र काबरा (दोन्ही रा. वासुपेठ नवीपेठ जुने बस स्टॅन्ड जळगाव), रौनक जैल (रा.संगप सोसायटी रिंगरोड जळगाव), शीतल विशाल लाठी, गायत्री अश्विनीकुमार राठी (दोन्ही रा. वासुकमल विहार, गुजराल पेट्रोल पंपाजवळ, जळगाव) यांनी दि. ६ सप्टेंबर २०२० पासून ते आज पावेतो (दि. १० मार्च २०२२) त्यांच्यासह इतर फ्लॅट धारकांना खरेदीखतात नमुद केलेल्या कारपेट क्षेत्राचा फ्लॅट दिला नाही. तसेच जळगाव महानगर पालिकेच्या मंजुर नकाशा प्रमाणे बांधकाम न करुन तसेच फ्लॅट बुकिंग वेळी दिलेल्या माहिती पुस्तिका नुसार व नमुद केलेल्या सुख सुविधा न देता परस्पर वासुकमल विहार फ्लॅट ओमर्स असोसिएशनची स्थापना केली. संशयित आरोपींनी संगनमताने व कटकारस्थानाने शितल विशाल लाठी यांना सोसायटीचे फ्लॅटधारक नसतांना देखील सोसायटीचे अध्यक्ष बनवले. तसेच बनावट लेटरहेड व बनावट शिक्के बनवुन बनावट कागदपत्रांद्वारे ठराव करुन एफडीचे व्यवहार केले. संशयित आरोपींनी मिळुनआर्थिक फायद्यासाठी फ्लॅट धारकांची संगनमताने व कट रचुन वासु कमलविहार सोसायटीच्या फ्लॅट धारकांना विश्वासात घेवून फसवणुक केली. याप्रकरणी भादवि कलम ४०६,४२० ४६५,४६७,४६८,४७१, १२० (ब) ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनिरी प्रदिप चांदेलकर हे करीत आहेत.