जळगाव (प्रतिनिधी) जळगावच्या एकाची साधारण साडेचार लाखात फसवणूक करणाऱ्या गुजरातत मधील एकाविरुद्ध शनिपेठ पोलीस स्थानकात गुन्हा करण्यात आला आहे.
या संदर्भात हमीद युसुफ कच्ची (रा. कासम वाडी, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत हमीद कच्ची यांनी म्हटलेय की, संशयित आरोप मुकेश मिस्त्री (अंबिका इंजिनिरीअर्स रा. अहमदाबाद, गुजरात) याने दि.१८ जानेवारी २०२२ रोजी आठवले बाजार पुष्पलता बेंडाळे चौक येथे टोमेटीक लोड सेल बेस फाइव्ह हेड लिक्वीड फिलींग मशीन हमीद यांच्या कंपनीस देण्यासाठी केलेल्या कराराचा भंग केला आहे. हमीद यांनी सदर मशीनसाठी अँडव्हांस ३५ टक्के रुपये अर्थात ४ लाख २३ हजार ८५० रुपये अॅक्सीस बँक खात्यातून अंबिका इंजिनीरीअर्सच्या इंडीयन बँक या खात्यात जमा केले होते. परंतू अद्यापही मशीन न मिळाल्यामुळे हामिद कच्ची यांनी आर्थिक नुकसान करुन फसवणूक केली आहे म्हणून भादवि कलम ४२० प्रमाणे मुकेश मिस्त्री विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी परी. पो. उपनिरी. प्रदीप बोरुडे हे करीत आहेत.