जळगाव (प्रतिनिधी) व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करून ठरवुन दिलेल्या ऑर्डरनुसार कास्टीम सोडा माल न पाठविता २१ लाख ६८ हजार २५० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात मुस्तफा नुरोद्दीन मकरा (रा.जळगाव,हेड पोस्ट ऑफिस समोर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २२ फेब्रुवारी २०२२ ते १५ सप्टेंबर २०२२ रोजीच्या दरम्यान जळगाव शहरातील ओंकार नगर जिल्हापेठ हेड पोस्ट ऑफिसचे समोर अज्ञात व्यक्तीने संगनमत करुन फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ठरवुन दिलेल्या ऑर्डरनुसार कास्टीम सोडा माल न पाठविता २१ लाख ६८ हजार २५० रुपयांची रोख रक्कम घेऊन फसवणुक केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि किशोर पाटील हे करीत आहेत.