पारोळा (प्रतिनिधी) येथील आदिनाथ फॅक्टरीला लागणाऱ्या कनव्हेअर स्क्रुच्या नावाखाली सांगलीच्या दोघांनी तब्बल सव्वातीन लाखात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, चकोर दिलीप जैन (वय ४१, रा. रथ गल्ली) यांची धरणगाव रोडवर आदिनाथ अॅग्रो इंडस्ट्रीज नावाची फॅक्टरी आहे. श्री. जैन यांना कंपनीच्या कामासाठी कनव्हेअर स्क्रुची आवश्यकता होती. त्यांनी इंटरनेटवर माहिती घेतली असता सांगली येथील एम. क्यू. इंडस्ट्रीजकडे कनव्हेअर स्क्रु उपलब्ध असल्याचे लक्षात आले. त्यामुळे जैन यांनी कंपनीचे मालक सरफराज मुजावर यांचेशी मो. क्र.7774056786, 9923641301 वर बोलणी करुन केली. मुजावर यांनी माल पुरविण्यास होकार दिल्याने. श्री. जैन यांनी ठरल्याप्रमाणे एक लाख रुअप्ये एचडीएफसी बँकत ऑनलाईन चेकने दिले. त्यानंतर दि. 21 मे 2021 रोजी 2 लाख 25 हजार रुपये रोख अब्दुल सामत नामक व्यक्तीजवळ दिले. परंतु त्या बदल्यात श्री. जैन यांना माल मिळाला नाही. संबंधितांना फोन केले असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तर दिली. दरम्यान, दिलेल्या पत्यावर श्री. जैन हे स्व:ता गेल्यावर तेथे वरील कंपनी अस्तितवातच नव्हती. यामुळे श्री. जैन यांच्या फिर्यादीवरून सराफ मुजावर (पूर्ण नाव माहित नाही), अब्दुल सामत (पूर्ण नाव माहित नाही), दोन्ही रा. हिराकुंज प्लॉट नं ७, गणपती मंदिर जवळ विश्राम बाग सांगली ता. जि. सांगली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद साळी हे करीत आहेत.