जळगाव (प्रतिनिधी) जवान फाऊंडेशनतर्फे ‘अमृत जवान अभियान २०२२’ अंतर्गत मोफत भव्य हृदयरोग (टूडी इको)/ईसीजी तपासणी शिबिराचे दिनांक १२ जून २०२२ रोजी सैनिक बहुउद्देशीय हॉल, महाबळ जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, सैनिक फेडरेशनचे ब्रिगेडियर सुधीर सावंत, महापौर जयश्रीताई महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, कर्नल अभिमन्यू नायडू, माजी खासदार तथा गोदावरी फाउंडेशनचे डॉ. अध्यक्ष उल्हास पाटील, सैनिक समाज पार्टीचे अँड. शिवाजीराव डमाळे, सैनिक समाज पार्टीच्या महिला अध्यक्षा सुनिता झिंझुर्डे, भुसावळ स्टेशन कमांडर कर्नल चंगाप्पा, गोपाल वानखेडे आदी उपस्थित राहणार आहेत.