बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील हरणखेड गावचे सरपंच रूपेश गांधी यांनी आ.एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खामगाव जिल्हा बुलढाणा येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित निवासी मूकबधिर विद्यालय रावण टेकडी येथील निवासी मुला व मुलींना फळे भेट दिली.
या निवासी मूक बधिर विद्यालयात ८० मुले व १९ मुली आहेत. त्यांना येथे विविध प्रकारचे शिक्षण दिले जाते. कौटुंबिक कामाने खामगाव येथे गेले असतांना रूपेश गांधी यांनी या शाळेस भेट दिली. या ठिकाणी आमदार खडसे यांचा वाढदिवस मुलांसोबत साजरा केला. यावेळी विवेक जोशी, कोमलसिंग पाटील, शाळेचे शिक्षक जयसिंगराव राठोड यांच्यासह आदी उपस्थित होते.
















