TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर साहित्य संमेलनासाठी आतापर्यंत ३ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर !

संमेलनाचे आयोजन ऐतिहासिक ठरावे यासाठी शासन कटीबद्ध !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 27, 2023
in अमळनेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अमळनेर येथे २ ते ४ फेब्रुवारी २०२४ रोजी पार‌ पडणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र शासनाकडून २ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय संसदीय कार्य मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही मुरलीधर यांनी ४० लाखांचा निधी मंजूर केला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खास बाब म्हणून नगरोत्थान योजनेतून संमेलनाच्या अनुषंगाने १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर केला आहे. खासदार रक्षा खडसे यांच्याकडून २० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशा प्रकारे संमेलनाच्या विविध कामांसाठी ३ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. साहित्य संमेलनाचे आयोजन ऐतिहासिक ठरावे.पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. यानुसार संमेलनास जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

मराठी भाषा विभागाचे मंत्री दिपक केसरकर यांनी २२ डिसेंबर २०२३ च्या शासन निर्णयान्वये अमळनेर साहित्य समेलनासाठी २ कोटी रूपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा तयारीचा राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीष महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नगरोत्थान या योजनेतून पुनर्नियोजनात साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने खास बाब म्हणून अमळनेर शहरांतील मधील अंतर्गत रस्त्यांसाठी १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर केला आहे. जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून हा निधी देण्यात आला आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

केंद्रीय संसदीय कार्यमंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही मुरलीधर यांनी मंजूर केलेल्या ४० लाखांच्या निधीतून प्रताप महाविद्यालय संमेलनस्थळी जाणाऱ्या रस्त्याची उभारणीसह दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच संमेलनासाठी येणाऱ्या साहित्यप्रेमींच्या सोयीसाठी प्रसाधनगृहांची उभारणी करण्यात येणार आहे. एमपीएलएडीएस (संसद‌‌ सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना) अंतर्गत हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. खासदार रक्षा खडसे यांनी साहित्य संमेलनासाठी २० लाखांचा निधी मंजूर केला आहे.

साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी अमळनेर मधील अंतर्गत रस्त्यांच्या विविध कामांच्या प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत. साहित्य संमेलन कामकाजाचा ते वेळोवेळी स्थानिक पातळीवर आढावा घेत आहेत. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी २५ डिसेंबर रोजी आयोजक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत संमेलन आयोजनाचा अमळनेर येथे आढावा घेतला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार आज, २६ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संमेलनस्थळी भेट देऊन पूर्वतयारीची माहिती घेतली. आयोजकांसोबत चर्चा केली. अमळनेर साहित्य संमेलनाचे आयोजन ऐतिहासिक ठरावे यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. खासबाब म्हणून आमदार निधी प्राप्त करून घेण्यासाठी ही जिल्हा प्रशासनाचा पाठपुरावा सुरू असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2026 !

March 25, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 27 डिसेंबर 2023 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोन्याच्या दरात इतक्या हजारांनी झाली घसरण ; गुंतवणूकदारांचे धाबेही दणाणले

March 20, 2022

आ. अनिल पाटलांनी टाकला शब्द, सिंजेडा कंपनीकडून शिरसोदे आरोग्य केंद्रात झाले दहा बेड उपलब्ध

June 25, 2021

राज्यातील जनताच फडणवीसांना राजकारणातून संन्यास देईल : नाना पटोले

June 28, 2021

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, ४ ऑक्टोबर २०२४ !

October 5, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group