नशिराबाद (प्रतिनिधी) शहरातील परीट धोबी समाज व तरुण दुर्गा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांची जयंती नुकतीच मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
दि २३ गुरुवार रोजी नशिराबाद येथील परीट धोबी समाज व तरुण दुर्गा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्ताने प्रतिमा पुजन व परिसरात स्वछता मोहीम राबविण्यात आली. या कार्यक्रम वेळी माजी ग्रा.पं. सदस्य सुदाम धोबी युवराज धोबी प्रहार जनशक्तीचे शहर अध्यक्ष मोहन माळी, अर्जुन कोळी, किशोर चव्हाण, राहुल चव्हाण, परेश प्रजापती, विवेक धोबी, आकाश धोबी, स्वामी कोळी आदी समाज बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.